दुर्दैवी घटना : बल्लारपूर शहरात भालेराव पब्लिक स्कुल मध्ये लिपिकाचा स्विमिंग पुलात बुडून मृत्यू


दुर्दैवी घटना : बल्लारपूर शहरात भालेराव पब्लिक स्कुल मध्ये लिपिकाचा स्विमिंग पुलात बुडून मृत्यू

 ◾बल्लारपूरात शिक्षक दिनी शाळेच्या परिसरातील स्विमिंग पुलात बुडून लिपिकाचा मृत्यू : विविध चर्चांना उधाण !

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : राज्यभरात  सर्वत्र डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती निमित्ताने शिक्षक दिनाचे कार्यक्रम सुरू असताना बल्लारपूर शहरात भालेराव पब्लिक स्कुल मध्ये लिपिकाचा स्विमिंग पुलात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली, मात्र ती आत्महत्या, आकस्मिक मृत्यू  की हत्या यावर सध्या तरी संशयास्पद आहे.

स्थानिक भालेराव पब्लिक स्कूल मध्ये कार्यरत असलेले व झाशीराणी चौक कन्नमवार वार्ड येथे लिपिक म्हणून काम करणारे संजय भैयाजी कटाने (52) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

आज शिक्षक दिनानिमित्त शाळेच्या व्यवस्थापनाने भालेराव शाळेत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी पार्टी आयोजित करण्यात आली होती.कार्यक्रमाला दुपारी 12 वाजता सुरुवात झाली. शाळेच्या स्विमिंग पुलाजवळ पावसाचे नृत्य देखील आयोजित करण्यात आले होते. उपस्थितांनी पावसाच्या नृत्याचा आनंद घेतला आणि शाळेच्या हॉलमध्ये जेवण करण्यासाठी बाहेर गेले. ते जलतरण तलावाच्या दिशेने जात होते. संध्याकाळी 4 च्या सुमारास उपस्थित सर्वजण जेवण करून घराच्या दिशेने जाऊ लागले, मग कुणीतरी संजय भैयाजी कटाणे हे स्विमिंग पुलावर पडल्याची माहिती दिली. सर्वांनी जलतरण तलावा जवळ धाव घेतली असता संजय वटाने हे स्विमिंग पूल मध्ये पडलेले आढळून आले त्यांना स्विमिंग पूल बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

शाळा व्यवस्थापनाने या घटनेची पोलिसांना माहिती दिली. पुढील तपास चालू आहे, पण प्रश्न असा निर्माण होत आहे की, जर मृतकाला पोहणे माहित होते, तर त्याचा बुडून मृत्यू कसा झाला? याविषयी अनेक चर्चाना उधाण आले असून सत्य परिस्थिती काय हे पोलीस तपासातून उघड होईलच मात्र या दुर्दैवी घटनेमुळे बल्लारपूरात शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर विरजण पडले आहे.







Post a Comment

0 Comments