विज पडून एक गंभीर जखमी

 

विज पडून एक गंभीर जखमी 

◾जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात शेती हंगामाला सुरुवात झाली असून अनेक शेतकरी आपल्या शेतात राबताना दिसून येतात मात्र निसर्ग कधी काय करेल याचा काही नेम नाही आज १९ सप्टेंबरला जिथे राज्यभरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे तिथे सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास बल्लारपूर तालुक्यातील कवडजई येथील शेतकरी असलेले श्री.महेश भेय्याजी कोहरे वय ( २४ ) वर्ष आपल्या शेतात काम करीत असताना पाऊस व विजांचा कडकडाट सुरू असताना वीज पडून जखमी झाले सदर घटना घडताच ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर रेफर करण्यात आले असून शेवटचे वृत्त येईस्तोवर त्यांच्यावर चंद्रपुरात उपचार सुरू आहेत.







Post a Comment

0 Comments