कृत्रिम तलावामध्ये गौरी-गणपतीचे विसर्जन करावे - आवाहन नगर परिषद बल्लारपूर



कृत्रिम तलावामध्ये गौरी-गणपतीचे विसर्जन करावे - आवाहन नगर परिषद बल्लारपूर 

🔸गणपती विसर्जन घाट, गांधी पुतळा परिसर अनेक महिलांनी गौरी विसर्जन करतांना दिसून आले.

🔸नगर परिषद बल्लारपूर च्या वतीने गौरी-गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : नगर परिषद बल्लारपूर च्या वतीने २०२१ या वर्षाकरिता बल्लारपूर शहरात ९ ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे मागील दीड वर्षांपासून भारतासह जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एका ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये या उद्देशाने राज्यभरात महाराष्ट्र सरकार व स्थानिक प्रशासनाच्या वतीने अनेक ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात येत आहे.

 या अनुषणगाने बल्लारपूर शहरातील वस्ती विभागात १) गणपती विसर्जन घाट, २) गांधी पुतळा परिसर, ३) कॉलरी गेट, तर डेपो विभागात १)साईबाबा वार्ड, २) गौरक्षण वार्ड, ३) गवाल पंछि ग्राउंड या ठिकाणी तर टेकडी विभागात १) कलामंदिर नाट्यगृह, २) विवेकानंद गार्डन, ३) दंतुलवार यांचे घराजवळ असे एकूण ९ ते १० कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली.

 असून बल्लारपूर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी न करता गौरी, घरगुती गणपती व सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी वरील कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले असून नागरिकांनी मॉस्क, सॅनिटाईजर व सोशल डिस्टनसिंग चे पालन करून आपल्या परिसरातील कृत्रिम तलावामध्ये गौरी-गणपतीचे विसर्जन करावे असे आवाहन नगर परिषदेचे अध्यक्ष मा.हरीश शर्मा, मा.विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर यांनी केले आहे विशेष बाब म्हणजे प्रशासनाच्या या आवाहनाला अनुसरून गणपती विसर्जन घाट, गांधी पुतळा परिसरात अनेक महिलांनी गौरी विसर्जन करतांना दिसून आले.






Post a Comment

0 Comments