आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शहरातील विविध विकासकामांचे भुमिपूजन

 




आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शहरातील विविध विकासकामांचे भुमिपूजन


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शहरातील बाबूपेठ, बगड  खिडकी आणि क्रिष्णा नगर येथील विविध विकासकामांचे भुमिपूजन संपन्न झाले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, विश्वजित शाहा, रुपेश पांडे, सलीम शेख, राशिद हुसेन, विनोद अनंतवार, नितीन शाहा, नंदा पंधरे, प्रशांत रोहणकर, तापूष डे, चंद्रशेखर देशमूख, आनंद रणशूर, गौरव जोरगेवार यांची उपस्थिती होती.
   आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात विकास कामांना गती आली आहे. अनेक कामांचे भुमिपूजन संपन्न झाले असून कामे प्रगतीपथावर आहे. दरम्यान बाबूपेठ येथील मुख्य मार्ग असलेला जेतवन बुध्द विहार समोरील मार्ग, क्रिष्णा नगर येथील पेविंग ब्लाॅक चे बांधकाम व बगड खिडकी येथील तिन सिमेंट काॅंक्रिट रोड व नालीचे कामे मंजूर करण्यात आली आहे. या कामांचे नुकतेच आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन संपन्न झाले. सदर सर्व कामे पूर्ण होताच येथील नागरिकांची मोठी अडचण दुर होणार आहे. हे कामे करण्यात यावी अशी येथील नागरिकांची जूनी मागणी होती. ति पूर्ण करता आली याचे समाधान आहे. या भागांचा विकास व्हावा यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. येथील काही कामे प्रगतीपथावर आहे. तर अनेक कामे प्रस्तावीत असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. कोरोनाच्या संकटामूळे अपेक्षीत असा निधी उपलब्ध करता आला नाही. असे असले तरी विविध माध्यमातून आपण शहराच्या विकासासाठी निधी आणला आहे. हा सर्व निधी दूर्लक्षीत भागात खर्च केल्या जात असल्याचेही ते या भुमिपूजन कार्यक्रमात बोलतांना म्हणाले. यावेळी स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 









Post a Comment

0 Comments