शिक्षकों सम्मान भाजपा मैदान राज्यव्यापी धरणे आंदोलन


शिक्षकों सम्मान भाजपा मैदान राज्यव्यापी धरणे आंदोलन


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने दिनांक 8 सप्टेंबर 2021 रोज बुधवार ला  शिक्षकों सम्मान भाजपा मैदान राज्यव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

          शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत ,शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीचा प्रशिक्षणाच्या तारखा तात्काळ घोषित करणे ,1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे बंद केलेले भविष्य निर्वाह निधीचे खाते तात्काळ सुरू करण्याबाबत. १ तारखेला वेतन मिळण्याबाबत व वेतनास विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याबाबत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम व वैद्यकीय प्रतिपूर्ती ची रक्कम तात्काळ मिळण्याबाबत. परिविक्षाधीन सहाय्यक शिक्षक ( शिक्षण सेवक ) शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात सातवा वेतन आयोग नुसार वाढ करण्यासंदर्भात व शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ तात्काळ सुरू करण्याबाबत भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीच्या वतीने दिनांक 8 सप्टेंबर 2019 रोज बुधवार ला दुपारी ३.०० वाजता जिल्हा परिषद समोर चंद्रपूर येथे राज्यव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे या राज्यव्यापी धरणे आंदोलनाचे  नेतृत्व  आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, खा. हंसराजजी कहिर, भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, महामंत्री नामदेव डाहुले , संजय गजपूरे, क्रिष्णा सहारे , राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टुवार करणार आहेत.

    जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन शिक्षकांच्या न्याय मागण्या मागण्यांकडे महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हा संयोजक गुरुदास कामडी, प्रा. अरुण राहंगडाले, रंजीव श्रीरामवार, जिल्हख सहसंयोजक अरविंद राऊत, गणेश तर्वेकर,   श्रीकांत कुमरे,  प्रा.पुंजाराम लोडे,स्नेहल बांगडे, मंगला बंडीवार आदींनी केले आहे.







Post a Comment

0 Comments