बल्लारपूर शहरात पाऊसामुळे घर कोसळलेल्या परिवाराला नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी प्रत्यक्ष भेट देवुन केली आर्थिक मदत


बल्लारपूर शहरात पाऊसामुळे घर कोसळलेल्या परिवाराला नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी प्रत्यक्ष भेट देवुन  केली आर्थिक मदत 

◾पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसा निमित्त सेवा समर्पण सप्ताह अंतर्गत

◾भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरात पावसामुळे घर कोसळले  बुध्द नगर/ संतोषीमाता  वॉर्डातील घटना दि . 7/9 /2021 घडली. बल्लारपूर शहरातील  रहिवासी असलेले प्रजापती यांचे कवेलूचे मातीचे घर मागील ३ ते ४ दिवसाच्या पावसामुळं कोसळले त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाला . 

 पावसामुळे  बुध्द नगर/ संतोषीमाता वार्डातील श्री.देवनाथ प्रजापति यांचे घर कोसळले असता,नगराध्यक्ष हरीश शर्मा यांना कळताच त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली व परिवाराला या आकस्मिक आलेल्या संकट काळी न घाबरता स्वतःला सांभाळण्या करिता धीर दिला व आर्थिक मदत केली. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष श्री.काशी नाथ सिंह,महामंत्री श्री.मनीष पांडे,भाजयुमो शहर महामंत्री श्री.घनश्याम बुरडकर,श्री.राजेश कैथवास,अशोक कैथवास,श्री.बबलू गुप्ता हे उपस्थित होते.










Post a Comment

0 Comments