हादरणारी घटना : एकाच परिवारातील चार सदस्यांची सदस्यांची हत्या


हादरणारी घटना : एकाच परिवारातील चार सदस्यांची सदस्यांची हत्या

◾गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांची हत्या : नेमकी हत्या की अजून काही ? तर्कवितर्काला उधाण 

गोंदिया ( राज्य रिपोर्टर ) : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चुरडी येथील जिवाला हादरणारी घटना झाली आहे.एकाच परिवारातील चार सदस्यांची सदस्यांची हत्या किं नेमकं काय ? झाल अजूनपर्यंत हे स्पष्ट होऊ शकले नाही. मृतकामध्ये चुरडी रहिवासी रेवाचंद बिसेन ५१ वर्ष, पत्नी मालती बिसेन ४० वर्षे, मुलगा तेजस १८ वर्ष व मुलगी पोणिमा २० वर्ष असे मृतकाचे नाव असुन नेमकं हत्या कि काय आहे हे स्पष्ट झाले नाही. चार मृतकाचे शव शवविच्छेदन करिता तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती तिरोडा पोलासांनी देण्यात आली आहे. तिरोडा पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पुढिल तपास करीत आहेत. परतु या घटनेची चर्चा सोशल मिडियावर पसरतात चुरडी गावाला छावणी चे रूप आले होते. मात्र या घटनेचे गूढ अजुन कायम आहे. पुढील तपास तिरोडा पोलिस करित आहेत.








Post a Comment

0 Comments