जेसीआय पेगासिस तर्फे : शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

 



जेसीआय पेगासिस तर्फे : शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान 

विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांचे कार्य मोलाचे :- मनोज बेले

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या, तरी शिक्षकांच्या वतीने विद्यार्थी घडविण्यासारखे मोलाचे कार्य अविरतपणे सुरू आहेत. शिक्षकांच्या या कार्याला सलाम. असे प्रतिादन जेसीआय पेगासिस तर्फे आयोजीत 'कार्य गौरव पुरस्कार' कार्यक्रमात प्रास्ताविक भाषणा दरम्यान क्लबचे प्रोजेक्ट डायरेक्टर मनोज बेले केले.  शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस साजरा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून जेसिआय पेगासिस तर्फे रविवार'ला बालाजी मंदिर सभागृह येथे प्रा. राजेंद्र खाडे, श्रीनिवास उन्नावा, मुख्याध्यापक नारायण चुणारकर या शिक्षकांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

 "मंदिराच्या या पवित्र अश्या प्रणांगणात माझ्या हातून शिक्षकांचा सन्मान हा माझ्या आयुषयातील अविस्मणीय क्षण असल्याची भावना अध्यक्षयीन भाषणादरम्यान डॉ. श्रीनिवास तोटा यांनी व्यक्त केल्या. "  कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण मनोज बेले यांनी केले. संचानालन  सलमान सर यांनी तर आभारप्रदर्शन योगेश वालकुंडवार यांनी केले. यावेळी श्रीनिवास तोटा, प्रतीक बैस, मनोज बुंदेला, राजेंद्र शुक्ला यांच्यासह ईतर सदस्य उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments