विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा प्रतिनीधी राज्याच्या सभागृहात असणे काळाची गरज - सरकार्यवाह सुधाकर अडबाले
नागभीड ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ सभागृहात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा प्रतिनीधी मागील दहा वर्षापासून नसल्यामूळे शिक्षकांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अतिरीक्त शिक्षकांचा प्रश्न, शासन निर्णय 1 तारखेला वेतन असतांना सुध्दा वेतन सातत्याने उशिरा होणे, विनाअनुदानित शाळांना अनुदान, जूनी पेंशन योजना, अतिरीक्त शिक्षकांच्या समस्या अश्या अनेक समस्या आवासून उभ्या असतांना विद्यमान शिक्षक आमदार या साध्या-साध्या शिक्षकांच्या अडचणी सोडवू शकले नाही याची खंत वाटते म्हणून महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा प्रतिनधी असणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी नागभिड तालुका शिक्षक मेळाव्यात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाकार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे तर काॅग्रेस नेते, सिनेट सदस्य अॅड.गोविंदराव भेंडारकर, विमाशिचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे,कार्यवाह श्रीहरी शेंडे, प्रसिध्दी प्रमुख प्रभाकर पारखी, उपाध्यक्ष तथा सिनेट सदस्य सुनिल शेरकी, सहकार्यवाह अनिल कंठीवार,सोनाली दांडेकर,संघटक धनंजय राऊत, नागभीड तालुका अध्यक्ष प्रविण नाकाडे,सचिव सतीष मेश्राम, सल्लागार डी.जी.ठाकरे,ब्रम्हपूरी अध्यक्ष भोजराज खोब्रागडे, रोहणकर सर, मुख्याध्यापक राऊत सर विचारपिठावर उपस्थित होते.याप्रसंगी पुढे बोलतांना श्री.अडबाले सर म्हणाले की, विदर्भातील कोणत्या शिक्षक संघटनेने नक्षलग्रस्त भत्ता परत मिळवण्यासाठी आंदोलन केले ? विनाअनुदानित शाळांचा प्रश्न,जुनी पेन्शन योजना,अतिरीक्त शिक्षकांचा प्रश्न घेवून कोण रस्त्यावर उतरूण लढत आहे हे विदर्भातील प्राध्यापक,मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना चांगल्याप्रकारे माहित आहे.नागपूर विभाग विधान परिषद सदस्य ( शिक्षक आमदार ) पदाची निवडणूक डिसेंबर 2022 मध्ये होत आहे.
ही तारीख जसजशी जवळ येईल त्याप्रमाणे बिल्डर, शिक्षणसम्राट, कावळयाच्या छत्रीप्रमाणे उगवनाऱ्या कामचलाऊ शिक्षक संघटना, आम्ही शिक्षकांचे कैवारी म्हणून फोटोछाप नौटंकी आंदोलन करणारे आंदोलनवीर, मोठ्या संख्येने या निवडणूकीत उतरणार आहे.तेव्हा आता आपण सर्व शिक्षकांची जबाबदारी फार मोठी आहे. आपण सर्वांनी सावध राहून सर्व प्राचार्य,मुख्याध्याक,प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यापर्यंत पोहचून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने विदर्भाच्या सहाही जिल्हयात केलेल्या कामाचा आलेख पोहचवायचा आहे. आणि आपण हे काम विमाशिचा सैनिक म्हणून विनम्रतेने करावयाचे आहे. आपण प्रथम तालुक्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समस्या आहेत त्या जिल्हास्तरावर पाठवून सोडवून घेतल्या पाहिजे जिल्हा कार्यकारीणी सदैव आपल्या पाठीशी आहे.
याप्रसंगी अॅड.गोंविदराव भेंडरकर म्हणाले की, सरकार्यवाह श्री.सुधाकरराव अडबाले एक समर्थ नेतृत्व आहे.त्यांच्यासोबत आपण सर्व राहू या.या प्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे म्हणाले की, आपल्या तालुक्यातील समस्या आपण जिल्हास्तरावर कळविताच आम्ही शिक्षणाधिकार्याना, वेतन अधिक्षक, लेखाअधिकारी, कोषागार विभागाला,भेट देवून त्या अग्रक्रमाने सोडवत असतो.विदर्भ माध्यमिक शीक्षक संघ फोटोछाप आणि व्हाट्सअॅप वरील बातमीप्रमाणे काम करत नाही तर प्रत्यक्ष मैदानात,रस्त्यावर आंदोलन,बैठका, निदर्शने करून शिक्षकांच्या समस्या सोडवित असतो. आज आपण बऱ्याच फोटोछाप आंदोलनवीराच्या व्हाट्सअॅप वरील बातम्या व्हाट्सअॅप,फेसबुकवर वाचतो.जर त्यांनी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना भेटून प्रश्न रेटला असेल तर बातमी सोबत फोटो ही असला पाहिजे पण असे होतांना दिसत नाही आणि म्हणून आपण खरे आणि खोट्यामधील फरक ओळखला पाहिजे.
याप्रसंगी मत्ते मॅडम म्हणाल्या की ”आम्ही कोणाच्या पैठणी आणि पैशाच्या आमिषाला बळी पडणार नाही.“ तर आम्ही तालुक्यातील सर्व शिक्षक, शिक्षिका,प्राचार्य,मुख्याध्यापक,प्राध्यापक,काॅन्हेन्ट टिचर,आयटीआय लेक्चरर आम्ही सर्व सरकार्यवाह श्री सुधाकरराव अडबाले सरांच्या पाठीशी ठामपणे तन,मन,धनाने राहू. आम्हा शिक्षकीपेशातील लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न बिल्डर,रिअलइस्टेटधारक, शिक्षण सम्राटांनी करू नये असे म्हणताच सभागृहात टाळयाचा गजर झाला.याप्रसंगी तालुका अध्यक्ष प्रविण नाकाडे,सल्लागार डी.टी.ठाकरे, लक्ष्मणराव धोबे यांनीही आपले विचार व्यक्त केले.तालुका मेळाव्याचे प्रास्ताविक प्रविण नाकाडे,संचालन आणि आभार प्रदर्शन तालुका सचिव सतीष मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील प्राध्यापक,मुख्याध्यापक,प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments