बल्लारपुर शहरातील दिवगंत माजी नगराध्यक्षांच्या स्मृती प्रित्यर्थ साईबाबा वार्डात "स्मृती उद्यान"

  


बल्लारपुर शहरातील दिवगंत माजी नगराध्यक्षांच्या स्मृती प्रित्यर्थ साईबाबा वार्डात "स्मृती उद्यान"

🔸पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्य सेवा समर्पण सप्ताह  कार्यक्रमा अंतर्गत  "स्मृती उद्यान" चे लोकार्पण.

🔸बल्लारपुर शहराच्या विकासात आपल्यापरी प्रयत्नाची पराकाष्टा करित सेवा दिलेल्या दिवगंत माजी नगराध्यक्षांना खरी श्रध्दांजली - हरीश शर्मा नगराध्यक्ष

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्य सेवा समर्पण सप्ताह  कार्यक्रमा अंतर्गत बल्लारपुर शहरातील साईबाबा वार्डात स्मृती उद्यानाचे लोकार्पण मा.चंदनभैय्या चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ यांचे हस्ते,नगराध्यक्ष मा.हरीशजी शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी संबोधित करतांना म्हणाले की बल्लारपुर शहराच्या सर्वांगीन विकासा करिता आपल्यापरी सेवा दिली अश्या दिवगंत माजी नगराध्यक्षांच्या स्मृती निरंतर आभादित असावी  करिता या उद्यानाची कल्पना करण्यात आली.

आज प्रत्यक्षात जेव्हा याचे लोकार्पण होत आहे तर असे वाटते कि त्या दिवंगतांना खरी श्रध्दांजली आहे. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष श्री.काशी नाथ सिंह,स्वच्छता सभापती,श्री.येलय्या दासरफ,नगर सेविका सुवर्णाताई भटारकर,भाजपा महिला आघाडी अध्यक्ष सौ.वैशालीताई जोशी,भाजपाचे पदाधिकारी  श्री.अरुणभाऊ भटारकर व सौ.आरती अक्केवार,श्री.राॅय सर तसेच मोठ्या संख्येने वार्डातील महीला व पुरुष उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments