पोलिस स्टेशनमध्येच पोलिस नाईकास ५०० रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले
🔹पोलिस स्टेशनमध्येच लाचलुचपत विभागाच्या धडाकेबाज कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले..
जळगाव/रावेर ( राज्य रिपोर्टर ) : किरकोळ दारू विक्री करूं देण्याच्या अटीवर पाचशे रुपये हप्ता मागणाऱ्या पोलिस नाईकास लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी फैजपूर पोलिस स्टेशनमध्येच जाळ्यात अडकविल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.पोलिस स्टेशनमध्ये लाच घेण्याची हिंमत बरबटलेल्या पोलिसांकडून होत असल्याने खाकीवर्दीची नाहक बदनामी होत चालली आहे तरी जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबांनी थोडे कडक मध्ये घेण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.दरम्यान लाचलुचपत विभागाच्या धडाकेबाज कारवाई ने जिल्हाभर सर्व सामान्य जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी तक्रारदारांस ( पुरुष,वय-20, रा.पिंपरुड, ता.यावल, जि.जळगाव ) किरकोळ दारू विक्री करू देण्यासाठी फैजपुर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक, श्री.अनिल भगवान महाजन( वय-४०,पोलीस नाईक,ब.नं.२९६५ ), रा.भोकरीकर गल्ली, रावेर, ता.रावेर,जि.जळगाव, वर्ग-३. यांनी तक्रारदार यांचा किरकोळ दारू विक्रीचा व्यवसाय असुन सदर व्यवसायावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दरमहा ५००/- रुपये हप्त्याप्रमाणे पहीला हप्ता म्हणुन ५००/- रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली व सदर लाचेची रक्कम स्वतःआरोपी यांनी फैजपुर पोलीस स्टेशन येथे पंचासमक्ष स्वीकारत लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून कारवाई केली. सदर धडाकेबाज कारवाई श्री. सुनील कडासने ( पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक ), श्री. निलेश सोनवणे ( अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक ) व श्री. सतीश डी.भामरे, ( पोलीस उपअधीक्षक, वाचक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक ), श्री .नरेंद्र पवार ( पोलिस उपअधीक्षक, वाचक, ला.प्र.वि नाशिक परिक्षेत्र, नाशिक ) यांच्या आदेशानुसार श्री.शशिकांत श्रीराम पाटील , ( पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव ) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.शशिकांत एस.पाटील, पोलीस उप अधीक्षक, PI. संजोग बच्छाव, पोलीस अंमलदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ. यांच्या पथकाने केली . जिल्ह्यात सध्या लाच घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर फोफावली असली तरी विभागाच्या धडक कारवायांनी लाच बहाद्दरांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
0 Comments