वाढदिवस रस्त्यावर साजरा कराल तर होईल पोलीस कारवाई
◾वाढदिवसाच्या नावाखाली धिंगाणा घालण्याचा एक नवीन प्रकार
◾रस्त्यावर एकत्र येत वाढदिवस साजरा करण्याचा प्रवृत्तीत वाढ होत आहे
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : अलीकडे सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर एकत्र येत वाढदिवस साजरा करण्याचा प्रवृत्तीत वाढ होत आहे बल्लारपूर शहरातील बस्ती विभाग, गणपती विसर्जन घाट, ऐतिहासिक किल्ला, टेकडा विभाग,डेपो विभाग, विसापूर-नांदगाव रोड परिसरात तर वाढदिवसाच्या नावाखाली धिंगाणा घालण्याचा एक नवीन प्रकार उदयास येत आहे याशिवाय काही ठिकाणी तलवारीने केक कापणे, मध्यरात्री फटाके फोडणे, इतकेच नव्हे तर वाढदिवसाच्या निमित्ताने डीजेच्या तालावर रस्त्यावर गोंधळ घातला जातो मागील काही दिवसात असे प्रकार निदर्शनास येत आहे मात्र आता सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर वाढदिवस साजरा करून धिंगाणा घालणे आता अलगट येऊ शकते पोलिसांच्या नजरेस सदर प्रकार आढळून आल्यास संबंधितास पोलीस कोठडीची ही हवा खाण्याची पाळी येऊ शकते बल्लारपूर शहरात सद्यस्थितीत अनेक तरुण तरुणी आपल्या मित्र मैत्रिणीसह वाढदिवस साजरा करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वा रस्त्यावर साजरा करतांना दिसून येतात यावेळी सेलिब्रेशनच्या नावाखाली आरडाओरड करण्यात येते इतकेच नव्हे तर रात्रीच्या वेळी काही तरुण केक कापत असतांना फटाके उडवीत असतात अशा वेळी एखाद्याने समज देण्याचा प्रयत्न केल्यास त्यालाच दमदाटी करण्यात येते त्यामुळे सामान्य नागरिक अशा बाबीकडे दुर्लक्ष करतो मात्र आता अशा घटनांवर आळा बसण्याची शक्यता आहे पोलीस विभागाला सार्वजनिक ठिकाणी वा रस्त्यावर वाढदिवसाच्या नावाखाली धिंगाणा घालतांना आढळून आल्यास पोलीस कारवाई होण्याची शक्यता आहे.
0 Comments