रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता दातारा गाव ते एम. आई. डी. सी. रोड ठरतो अपघाताला निमंत्रण




रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता  दातारा गाव ते एम. आई. डी. सी. रोड ठरतो अपघाताला निमंत्रण 

◾रोड त्वरीत दुरुस्त करावा,विदर्भ राज्य आंदोलन समिती चंद्रपुर यांची मागनी.

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  ग्रामपंचायत दाताळा ते एम आई डी सी रोड वर दाताळा चौकात रस्त्यात खड्डेच खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते यां रस्त्यावर दररोज वाहन चालकांचे अपघात होत आहे.

 सुदैवाने जीवितहानी झाली नाही हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा ठरत असल्याने या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी विदर्भ राज्य आंदोलन समिती चंद्रपुर व तसेच नागरिकांनी केली आहे अन्यथा तिव्र आंदोलन करन्याचा इशाराही प्रशासनाला दिला आहे.  

काही वर्षा पूर्वी यां रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते पण डांबरीकरण झालेल्या व चांगल्या रोडवर म्हाडा तर्फे पाईप लाईनचे बांधकाम करण्यात आले त्यामुळे चांगल्या अवस्थेत असलेल्या रोड फोडून पाईपलाईन चे काम करण्यात आले पण ठेकेदार रोडवर पडलेले खड्डेभरण्याचे विसरून गेले व दाताळा चौकातील रोडला मोठेमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात या खड्ड्यामध्ये पाणी साचून रस्त्याच्या सभोवती चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

रामनगर ते एम आई डी सी रोड रस्ता सदैव वर्दळीचा असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहन चालत आहेत या गावातील वाहन चालविणाऱ्या नागरिकांना हा रस्ता मोठा धोकादायक ठरत आहे शासन अपघात टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करतात परंतु या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने हा रस्ता 'आभाळ फाटलं त्याला ठिगळ कुठे लावणार' ? असा झाला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने दुचाकीवाल्यांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.रात्रीचे वेळी या रस्त्यावर येणारी नवीन वाहने काही ठिकाणी रस्ता चांगला असल्याने वाहन जोरात हाणतात परंतु त्यांना माहीत नसते की या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे तेव्हा त्यांचा अनेक वेळा अपघात झालेला आहे.या रस्त्यावर खड्डे तर पडलीच आहे परंतु त्या खड्ड्यामध्ये बारीक गिट्टी जमा झाली असल्याने समोरून वाहन आल्यानंतर त्या वाहन चालकांना खड्ड्यातून वाहन घालवावी लागते तेव्हा गाडी स्लिप होऊन अनेक वेळा अपघात झालेले आहेत परंतु सुदैवाने जीवित हानी झाली नाही ही महत्त्वाची बाब आहे.

.तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समिती चे चंद्रपुर जिल्हा कार्याध्यक्ष व सामाजीक कार्यकर्ते योगेश भाऊ मूरेकर व जिल्हाध्यक्ष किशोर जी दहेकर यांनी केली असुन दाताळा गावातील नागरिकही आता रस्तादुरुस्तीसाठी आक्रमक झाले आहेत.त्वरीत रस्ता दुरुस्त करावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करन्याचा इशाराही प्रशासनाला दिला आहे.

सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपुर यांना निवेदन देताना वि. रा. आ. स. चे कार्याध्यक्ष योगेश भाऊ मूरेकर, जिल्हाध्यक्ष किशोरजी दहेकर युवा आ. उपाध्यक्ष अविनाश उके, ईश्वर सहारे, जितेंद्र सोमलकर,मुन्ना आवळे,वाघमारे,अनिल दिकोंदवर, व इत्त्यदी पदाधीकारी व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments