बल्लारपूर खूण प्रकरणातील सर्वा आरोपी अटकेत

 


बल्लारपूर खूण प्रकरणातील सर्वा आरोपी अटकेत  

वाहनाला अपघात झाल्याने खुनातील आरोपी अडकले पोलिसांच्या जाळ्यात

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एका ३२ वर्षीय तरुणाचा खून करून मारेगावमार्गे पळून जात असताना मारेकऱ्यांच्या वाहनाला मारेगाव येथे अपघात झाला. त्यामुळे खून प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ही घटना मंगळवारी घडली.

बल्लारपूर येथील मृतक  मिलिंद बोंदाळे ( ३२ ), सलमान मजिद खान पठाण ( २४ ) व गणेश नरेश जंगम्मवार ( २० ), सर्व रा.दादाभाई नौरोजी वाॅर्ड, बल्लारपूर यांच्यात वाद झाला. या वादात सलमान व गणेशने मिलिंदच्या डोक्यावर वार केला. मध्यस्थीसाठी गेलेला संघपाल कांबळे ( रा, गणपती वाॅर्ड, बल्लारपूर ) हादेखील गंभीर जखमी झाला. दोन्ही जखमींना चंद्रपूर येथे उपचारासाठी भरती केले असता, मिलिंंद बोंदाळे याचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचे गुन्हे दाखल होताच, आरोपी चारचाकी वाहनाने मारेगावमार्गे  पळून जात असताना त्यांच्या गाडीचा मांगरूळजवळ मंगळवारी सकाळी MH 34 AA 5113  अपघात झाला. परिसरातील नागरिकांनी अपघात वाहनातील तरुणांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्राथमिक उपचारानंतर हे तिघेही रुग्णालयातून पळून गेले.

याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. तसेच या जखमी तरुणांना घेण्यासाठी बल्लारपूर येथून एक स्काॅर्पिओ मारेगावकडे निघाल्याची टीपदेखील पोलिसांना मिळाली. बल्लारपूर पोलिसांनी लगेच यासंदर्भात मारेगाव पोलिसांना कळविले. मात्र आरोपी रुग्णालयातून पळून गेल्याने ते मारेगाव पोलिसांच्या हाती लागले नाही.  

घटनेची गंभीरता घेवून बल्लारपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार उमेश पाटील यांनी तपासचक्र जलदगतीने हलवीत मारेगाव पो.स्टे .चे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांना सूचना केल्यानंतर नितीन खांदवे  यांनी त्पासातगती मिळविली. काही वेळातच बल्लारपूर पोलीस पथक मारेगाव येथे दाखल झाले. आरोपीना  सिनेस्टाईल पाठलाग सरू झाला. अवघ्य 20 कि .मी . अंतर असलेल्या करंजी येथून एकास तर दोघांना करंजी जि. अकोला येथून पोलिसांनी ताब्यात घेत संशायित  आरोपी    सलमान मजिद खान, गणेश जंगम्मवार, चालक विष्णू ( २१ ) याला ताब्यात घेतले. मात्र त्यांना घेण्यासाठी निघालेली स्काॅर्पिओ मारेगाव पोलिसांनी पकडली. 









Post a Comment

0 Comments