बल्लारपूर मधील कीन्हीं गावात पतीने पत्नीची हत्या केली कारण नाममात्र दारू

 



बल्लारपूर मधील कीन्हीं गावात पतीने पत्नीची हत्या केली कारण नाममात्र दारू

◾दारूची नशा आणि सासऱ्या सोबतचा वाद कारणीभूत ठरला पत्नीच्या हत्येसाठी

 ◾बल्लारपूर( किन्ही ) हत्येप्रकरणी आरोपीचा न्यायालयात जवाब

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर तालुक्यातील किन्ही गावात २ सप्टेंबरला रात्री ११:३० वाजताच्या सुमारास पती मनोजने आपली पत्नी सुषमाला बेदम मारहाण केली. घटनेच्या दिवशी गावात भजन होते. त्या भजनात पत्नी सुषमा'चे वडिलांचा सहभाग होता. समोर पत्नीचे वडील दिसले. यामुळे आरोपी मनोज सुरेश कंन्नाके याचा मद्याच्या नशेत राग अनावर झाला. या रागाच्या भरात ( दि.२ सप्टेंबर ) गुरुवारला रात्री ११.३० च्या सुमारास पत्नी सुषमा कंन्नाके हिला जबर मारहाण केली. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर मागील ३ दिवसापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, गंभीर दुखापतीमुळे उपचारा दरम्यान रविवार'ला ( दि.५ सप्टेंबर ) रोजी रात्री १०:१५ वाजता सुषमा कंन्नाके हिचा अवघ्या वयाच्या २६ व्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झाला. तिला एक वर्षाची गोंडस मुलगी आहे. घटनेनंतर गावातील पोलीस पाटील अरुण नागोबा बुच्चे यांच्या तक्रारीरून आरोपी पती मनोज कंन्नाके याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्याने पत्नी'च्या वडिलांविषयी मनात द्वेष होता. त्यातून पत्नीशी वाद झाला. आणि या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याचे आरोपी मनोज सुरेश कंन्नाके यांने कबुल केले. त्याच्यावर बल्लारपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्याची दारूबंदी हटली व दारूचा पूर जिल्ह्यात वाहू लागला, मात्र यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले, बल्लारपूर मधील कीन्हीं गावात पतीने पत्नीची हत्या केली कारण नाममात्र होते.

आरोपी मनोज व सुषमा चा आंतरजातीय प्रेम विवाह झाला होता, मुलींच्या कुटुंबातून लग्नाला विरोध कायम होता मात्र २ सप्टेंबर ला गावात भजनाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात सुषमाच्या वडिलांचा सहभाग होता, सासरे दिसल्याक्षणी मनोज व त्यांच्या सासऱ्यात भांडण झाले, सुषमाच्या वडिलांनी त्याला भजन कार्यक्रमातून बाहेर काढले आणि त्या गोष्टीचा राग पकडून मनोजने पत्नी सुषमा सोबत भांडण सुरू केले, भांडण इतके विकोपाला गेले की मनोज ने पत्नीला जमिनीवर पटकने सुरू केले.

सुषमाच्या वडिलांचा राग मनोजने पत्नीवर काढत तिची हत्या केली, यावेळी आरोपी हा दारूच्या नशेत होता, जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे असे कारण देत दारूबंदी उठवली मात्र आता दारू सुरू झाल्यावर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, यावर अजूनही पोलीस प्रशासनाला नियंत्रण मिळविता आले नाही.

आरोपीला आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास मा. न्यायालयात हजर करण्यात आले असता. मा. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा पुढील तपास उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमीझ  मुलांनी हे करीत आहेत.







Post a Comment

0 Comments