रमाई घरकुल योजनेतील १५११ घरकुलाचे बांधकाम पूर्ण

 


रमाई घरकुल योजनेतील १५११ घरकुलाचे बांधकाम पूर्ण

◾चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत ३३५ घराचे काम प्रगतीपथावर

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर )  : शहरी भागातील अनुसूचित जातीच्या लोकांसाठी रमाई आवास / रमाई घरकुल योजना राबविली जाते. कच्चे घर असणाऱ्या कुटुंबांना नवीन पक्के घर बांधकामासाठी आर्थिक साहाय्य करण्यात येत आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत या योजनेअंतर्गत २ हजार ४२२ घरकुलाचे उद्दिष्ट होते. यातील १५११ घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, ३३५ लाभार्थ्यांच्या घराचे काम प्रगतीपथावर आहे.
 
शहरात आपले घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, अनुसूचित जातीच्या व्यक्तींना त्यांच्या बिकट परिस्थितीमुळे स्वतःच्या उत्पन्नातून चांगल्याप्रकारे पक्के घर बांधणे शक्य होत नाही. शहरी भागातील बहुतांश लोक कच्या घरामध्ये राहतात. म्हणून अनुसूचित जातीच्या लोकांना त्यांचे राहणीमान उंचावण्याच्या व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून रमाई घरकुल योजना राबविण्यात येत आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत २०१६ पासून ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.  महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात या योजनेअंतर्गत २ हजार ४२२ घरकुलाचे उद्दिष्ट होते. यातील १५११ घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, ३३५ लाभार्थ्यांच्या घराचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेमुळे अनेक गरीब कुटूंबाना हक्काचे घर उपलब्ध झाले आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील अनुसूचित जातीतील कुटुंबातील नागरिकांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे.








Post a Comment

0 Comments