राजुरा शहरात शिवसेनेचे भगवे वादळ सुरु

 



राजुरा शहरात शिवसेनेचे भगवे वादळ सुरु

🔸राजूरा शहरातील  शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रनालीला प्रेरित होऊन संपूर्ण राज्यात शिवसेनेचा जनाधार वाढताना दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय संदिपभाऊ गिऱ्हे व युवासेना जिल्हाप्रमुख निलेशभाऊ बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात राजुरा तालुक्यात शिवसेनेत इनकमिंग चालू झाले. येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद  निवडणुकीला केंद्रित करून जिल्हाप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे.

राजुरा तालुक्याचे कार्यतत्पर तालूका प्रमूख /नगरसेवक  राजू भाऊ डोहे  व राजुरा शहर प्रमुख निलेश भाऊ गंपावार  यांच्या नेतृत्वात राजुरा   येथील  इंदिरा नगरा तील शेकडो नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी  राजूरा विधानसभा संघटक नरसिंगभाऊ मादर ,सुनीलभाऊ लेखराजनी शहर समन्वयक, सास्तीचे उपसरपंच व युवासेना तालुका चिटणीस ( संघटक ) कुणाल निळकंठ कुडे ,युवासेना राजूरा तालूका चिटणीस वतन मादर ,माजी युवासेना उपजिल्हा प्र.राकेश चिलकुलवार , माजी शिवसेना शहर प्र.भूवन  सल्लम,शिवसैनिक बालूभाऊ कूइटे,खूशाल भाऊ सूर्यवंशी,समीर शेख  आणि कार्यकर्ते उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments