बल्लारपूर शहरात गणेश विसर्जन उत्साहात व शांततेत संपन्न


बल्लारपूर शहरात गणेश विसर्जन उत्साहात व शांततेत संपन्न 

 बल्लारपूरात बाप्पाचे विसर्जन उत्साहात साजरे : प्रशासनाची उत्तम व्यवस्था 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : मार्च 2019 मध्ये आलेला कोरोना ठाम मांडून मुक्कामाला बसला की काय व त्यामुळे सर्व सण उत्सवावर असलेले निर्बंध यातून जनसामान्य माणसाची अजूनपर्यंत पूर्णपणे सुटका झाली नसून या सर्व बाबींचा प्रभाव महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाडक्या बाप्पावर ही झाला आहे १० सप्टेंबरला बाप्पाचे आगमन झाले १० दिवस मुक्काम करून अनंत चतुर्दशी च्या दिवशी १९ सप्टेंबरला बाप्पाला निरोप देण्यात आला तो पुढल्या वर्षी लवकर येण्याच्या आशेने, दरवर्षी प्रमाणे असलेले ढोल-ताशे, डीजेच्या तालावर नाचणारे गणेशभक्त, शिवाय आखाडे असे कोणतेही चित्र दिसत नसले तरी गणेशभक्तांचा उत्साह आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतांना दिसून येत होता.

          नगर परिषद बल्लारपूर च्या वतीने नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने गणेश विसर्जनासाठी बल्लारपूर शहरात जवळपास ८ ते १० ठिकाणी कृत्रिम जलकुंड तयार करण्यात आले होते मात्र गणेश भक्तांची श्रद्धा म्हणावी की आस्था बल्लारपूर शहरातील अनेक गणेश मंडळांनी गणपती विसर्जन घाट परिसर, पेपरमिल संपवले कॉलनी च्या पटांगणावर असलेल्या कृत्रिम जलकुंडातच गणपती विसर्जनाला प्राधान्य दिले आज सकाळ पासूनच घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांनी या ठिकाणी गणेश विसर्जन केले यावेळी नगर परिषद बल्लारपूर चे कर्मचारी निर्माल्य संकलन व गणेश विसर्जनासाठी सूचना देत होते तसेच बल्लारपूर पोलीस विभागाने या ठिकाणी चोख बंदोबस्त राखला होता विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली होती व यासंदर्भात वेळोवेळी निर्देश देण्यात येत होते रात्री १०:०० वाजेपर्यंत गणेश विसर्जन सुरू होते यावेळी आपले कर्तव्य चोख बजावून नागरिकांच्या सुरक्षेची हमी देऊन उत्सव साजरा करणाऱ्या पोलीस बांधवांनी स्थापन केलेल्या गणरायाचेही विसर्जन या गणपती घाट परिसर, संपवले कॉलनी ग्राऊंडवर करण्यात आले यावेळी मा.विजय सरनाईक मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर, मा.उमेश पाटील, पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने पोलीस बांधव उपस्थित होते एकूणच नगर परिषद बल्लारपूर, बल्लारपूर पेपरमिल(विजेची सोय) व पोलीस विभाग बल्लारपूर यांच्या सहकार्यातून बल्लारपूर शहरात गणेश विसर्जन उत्साहात व शांततेत संपन्न झाले.









Post a Comment

0 Comments