पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्य सेवा समर्पण सप्ताह कार्यक्रमा अंतर्गत उज्वला गॅस योजना व मतदार नोंदणी मार्गदर्शन व सहयोग शिबिराचे लोकार्पण

 



पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्य सेवा समर्पण सप्ताह  कार्यक्रमा अंतर्गत उज्वला गॅस योजना व मतदार नोंदणी मार्गदर्शन व सहयोग शिबिराचे लोकार्पण

🔸उज्वला गॅस योजनेमूळे करोडो भगिनींच्या जिवनात अमुलाग्र बदल - हरीश शर्मा नगराध्यक्ष


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्य सेवा समर्पण सप्ताह  कार्यक्रमा अंतर्गत श्रीराम वार्ड, बल्लारपुर येथे मा.चंदनभैय्या चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ यांच्या हस्ते,मा.हरीशजी शर्मा नगराध्यक्ष न.प.बल्लारपुर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाचे श्री.प्रकाश दोतपेल्ली व त्याचे सहकारी मित्र यांच्या कडुन सुरु करण्यात आलेल्या उज्वला गॅस योजना व नव मतदार नोंदणी मार्गदर्शन व सहयोग शिबिराचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी काही वरिष्ठ नागरिकांचे सत्कार करण्यात आले. श्री.मधुकर दुशेट्टीवार काका, श्री सुभाष सूर्यवंशी,श्री.तुराणकर काका, श्री. बापूजी  पोहनकर, श्री शांताराम निवलकर व  श्री. राजन्ना इर्गुराला तसेच यावेळी भाजपा चे पदाधिकारी काशीनाथ सिंह, मनीष पांडे, सारिका कनकम, सतीश कनकम, ठाकुर हनूमान सिंह, सुधाकर पारधी, मंगेश नंदगिरवार, राजेश कैथवास, शुभम बहुरीया तसेच   विजय पेड़पल्लीवार, शुभम शेटिये, संतोष मड़गुल, सुनील पोहनकर, आनंद शेन्डे, सुधीर सूर्यवंशी, सुधाकर , संजय ठाकुर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments