मा.खा. गजाननभाऊ कीर्तिकर साहेब शिवसेनानेते यांच्या वाढदिवसाच्यानिमित्य केक कापून ब्लॅंकेट वितरण करून अहेरी विधानसभा शिवसेनेच्यावतीने वाढदिवस साजरा.

 


मा.खा. गजाननभाऊ कीर्तिकर साहेब शिवसेनानेते यांच्या वाढदिवसाच्यानिमित्य केक कापून ब्लॅंकेट वितरण करून अहेरी विधानसभा शिवसेनेच्यावतीने वाढदिवस साजरा.

 गडचिरोली ( राज्य रिपोर्टर ) :  अहेरी विधानसभा येथील सार्वजनिक विश्रामगृह आलापल्ली येथे मा.विलासभाऊ कोडापे सहसंपर्क प्रमुख यांचे अध्यक्षतेखाली आणि श्री रियाज शेख जिल्हा प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.  खा. गजाननभाऊ कीर्तिकर साहेब शिवसेनानेते यांचा वाढदिवस उत्साहात केक कापून  साजरा करण्यात आला आणि वाढदिवसाचे गीत गाऊन शिवसेना महिलाआघाडीनी आनंद व्यक्त केले याप्रसंगी गजाननभाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ हैं, जय भवानी जय शिवाजी तुम्ह जिहो हजारो साल, साल के पचास हजार साल असे घोषणा बाजी करून वाढदिवस साजरा करण्यात आले.

 त्यानन्तर वाढदिवसानिमित्य ब्लॅंकेट वितरण करण्यात आले. ब्लॅंकेट वितरण कार्यक्रमांनंतर या शुभप्रसंगी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे बैठकीत मा. विलासभाऊ कोडापे सहसंपर्कप्रमुख यांनी आपल्या मार्गदर्शनात सर्वांना गणेश चतुर्थी निमित्य हार्दिक शुभेच्छा देऊन अहेरी विधानसभामध्ये येणाऱ्या पाच ही नगरपंचायत निवडणुकीत भगवा झेंडा फडकविण्यासाठी कामाला लागावे असे आव्हान केले. त्या नन्तर जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी शिवसेना महिला आघाडी, शिवसेना पदाधिकारी, युवासेना, युतीसेना पदाधिकारी व सर्व शिवसैनिक अहेरी विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शासनाचे विविध योजना जनसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी कार्य करावे असे मत व्यक्त केले. उपजिल्हा प्रमुख अरुणभाऊ धुर्वे यांनी आपल्या संभाषणात मा. उद्दवजी ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख यांच्या कुशल नेतृत्वावर विस्वास ठेवून इतर पक्षाचे अनेक कार्यकर्ता शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहे दिवसेंदिवस अहेरी विधानसभेत शिवसेना पक्ष मजबूत होत आहे. आणि गडचिरोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख मा. किशोर चंद्रकांत पोतदार यांनी मागील तीन वर्षापासून पक्ष बांधणीचे कार्य ऊत्तम केल्यामुळे आज पूर्ण जिल्ह्यात शिवसेनामय होत आहे. याचा पूर्ण श्रेय मा. किशोर पोतदार साहेब यांना जातो. हीच ती वेळ हा मंत्र घेऊन शिवसैनिक कमर कसली आहे. असे मत व्यक्त केले. यावेळी प्रामुख्याने अहेरी विधानसभा संघटक बिरजूभाऊ गेडाम, उपजिल्हा संघटिका सौं. पौर्णिमा ईष्ठाम, तालुका प्रमुख प्रफुल येरणे, सुभाष घुटे ग्रामीण तालुकाप्रमुख, तालुका संघटिका तुळजा तलांडी,आलापल्ली शहर प्रमुख सज्जू शेख, दिलीपभाऊ सुरपाम,  सौं प्रेमीला मडावी, इंदुताई गायकवाड, रसिका तलांडे,संगीता कन्नाके,  मनिष ईष्ठाम, स्वरूप गाजलवार, ललित,  यशोदा तलांडे, निर्मला सडमेक, राजू येनगंटीवार, सपना ईश्वरकर, अंकिता कन्नाके,  लक्ष्मी गोमासे व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments