चंद्रपुर जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या विविध खनिजांच्या सहाय्याने लघु व मध्यम उद्योग विकसित करावे : आ. सुधीर मुनगंटीवार

 




चंद्रपुर जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या विविध खनिजांच्या सहाय्याने लघु व मध्यम उद्योग विकसित करावे : आ. सुधीर मुनगंटीवार

🔸लघु व मध्यम उद्योजकांच्या शिष्टमंडळासह उद्योग मंत्री सूभाष देसाई यांच्याशी चर्चा 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपुर जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या विविध मिनरल्स च्या अनुषंगाने लघु व मध्यम उद्योग विकसित करावे या मागणीच्या अनुषंगाने माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज  लघु व मध्यम उद्योजकांच्या शिष्टमंडळासह उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी भेट घेत चर्चा केली.

या चर्चेदरम्यान बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले , राज्याच्या विकासाच्या दृष्टीने लघु व मध्यम उद्योगांचे बळकटीकरण अतिशय महत्वाचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योग अनेक अडचणींचा सामना करीत आहे. चंद्रपूर जिल्हा खनिज सम्पत्तीने सम्पन्न जिल्हा आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या विविध खनिजांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योग विकसित करावे अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या कडे केली.

या विषयासंदर्भात स्वतः  लक्ष देऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले .शिष्टमंडळात चंद्रपूर जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योजकांचा समावेश होता.









Post a Comment

0 Comments