चंद्रपूर येथील आनंद वाईन शॉप, मंगेश बार बंद करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना

 




चंद्रपूर येथील आनंद वाईन शॉप, मंगेश बार बंद करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना            

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर येथील आनंद वाईन शाप मंगेश बार बंद करा व बाजूलाच असलेली देशी भट्टी मुळे चंद्रपूर येथील नागरिकांना वाहतूक समस्या, शहरातच गुन्हेगारी प्रमाणात वाढ होणे अश्या प्रकारच्या समस्या निर्माण होत आहे तसेच नजीकच्या परिसरातील महिलांना व लहान मूलांना सुद्धा या आस्थपणांचा त्रास सहन करावा लागत आहे, या बाबींची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चंद्रपूर चे शहर अध्यक्ष मा. मनदीपभाऊ रोडे यांना मिळताच त्यांनी अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर यांना चंद्रपूर शहरातीळ मुख्य रस्त्यावर असलेले आत असलेले आनंद वाईन शॉप, मंगेश बार व बाजूची देशी भट्टी त्वरित बंद करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चंद्रपूर तीव्र आंदोलन करतील असे निवेदन देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चंद्रपूर चे शहर सचिव सुमित करपे, शहर उपाध्यक्ष एम.डी.समीर शेख, शहर उपाध्यक्ष ऍड. नवाज़ शेख संदीप आरडे, महिला सेनेच्या संगीताताई धात्रक, स्वाभी राउत उपस्थित होते .









Post a Comment

0 Comments