22 वर्षीय विद्यार्थी गळफास लावून आत्महत्या केली

  


22 वर्षीय विद्यार्थी गळफास लावून आत्महत्या केली

बीए अंतिम वर्षाला शिक्षण घेत होता

घुग्घुस ( राज्य रिपोर्टर ) : वेकोलीचे सेवानिवृत्त कामगार भगवान वाघमारे हेे घुग्घुसचे सुभाषनगर वसाहतीत क्वार्टर नं.195 येथे राहत असुन त्यांचा मुलगा प्रविण वाघमारे ( 22 ) यांनी राहते क्वार्टर मध्ये आज बुधवारला सायंकाळी 5:30 वाजता दरम्यान पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

प्रविण हा बीए अंतिम वर्षाला शिक्षण घेत होता परंतु तो लॉकडाऊन मुळे सुभाषनगर येथील आई वडिलांकडे क्वार्टर मध्येच राहत होता. आई कामानिमित्त बाहेर गेली होती व वडील झोपून असताना त्यांनी फाशी घेतली असल्याचे सांगितले जाते आत्महत्येचे नेमके कारण अस्पस्ट आहे. पोलिसांनी मर्ग दाखल केला असुन पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहेे.






Post a Comment

0 Comments