आम आदमी पार्टी चंद्रपुर तर्फे झेंडावंदन संपन्न

 

आम आदमी पार्टी चंद्रपुर तर्फे  झेंडावंदन संपन्न


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : 75व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे 
झेंडा वंदनाचा कार्यक्रम करण्यात आला. स्थानिक जनता काॅलेज चौक येथे झेंडा वंदन कार्यक्रम आपचे जेष्ठ पदाधिकारी श्री.मधुकरराव साखरकर यांचे हस्ते संपन्न झाला. 
यानंतर आपच्या पदाधिकारी यांची भाषणे झाली या कार्यक्रमाचे आयोजन श्री.मयुर राईकवार युवा जिल्हाध्यक्ष तथा संस्थापक सदस्य  यानी केले तसेच सहकार्य सीकंदर सागोरे तसेच राजेश चेडगुलवार यानी केले .यावेळी मयुर राईकवार यानी मार्गदर्शन करताना देशाला केजरीवाल मॉडल ची का गरज आहे याचे महत्व पटवुन देण्यात आले.
झेंडावंदन कार्यक्रमा नंतर अल्पोपहार तसेच मीठाई चे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन संतोष दोरखंडे यानी केले तर आभार प्रदर्शन  सिकंदर सागोरे यानी केले.
यावेळी सुनिल देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष, शाखेचे अध्यक्ष इन्‍द्रपाल यादव, राजेश पोटे ,सचिन खोबरागडे, देवेंद्र प्रधान, शेखर कोल्हे ,संतोष कोल्हे, संजय कार्लेकर ,गुरूप्रीत गिल, गिरधर मामीद्वार, मनोहर गाठे ,शुभम घाठे, प्रीत वाढवा, अमोल तिघाडे, अशोक आनंदे, अनिल राईकवार, भूपेंदर सिंह गिल, विजय कुडमेथे, हर्षल झोड़े, रघु ,प्रवीण दिघाड़े व पार्टी पदाधिकारी जिल्हा संघटन मंत्री राजेश बेले विधानसभा उपाध्यक्ष हीमायू आली,गीता वाढरे, माजी शहर उपाध्यक्ष अश्रफ अली सुनील भोयर संघटनमंत्री शहर, राजू कुडे शहर सचिव ,मुकेश वरारकर शहर अध्यक्ष युवा, चंदू माडूरवार अजय डुकरे इत्यादि सोबत परिसरातील व्यापारी मंडळी ऑटो संघटन मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments