चंद्रपूरच्या जिल्हा पुरवठा अधिकारी पदी राम जोशी तर बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी पदी दीप्ती सुर्यवंशी पाटील यांची नियुक्ती

 

चंद्रपूरच्या जिल्हा पुरवठा अधिकारी पदी राम जोशी                                      तर

बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी पदी दीप्ती सुर्यवंशी पाटील  यांची नियुक्ती

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र सरकारने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी पदाच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत यात ५ अधिकाऱ्याच्या बदल्या झालेल्या आहेत यानुसार नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांची चंद्रपूर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे तर दीप्ती सुर्यवंशी पाटील  यांची बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी बल्लारपूर च्या उपविभागीय अधिकारी पदी मा.संजयकुमार ढव्हळे यांनी पदभार सांभाळला होता मात्र प्रशासकीय कारणास्तव त्यांची गोंडपीपरी येथे उपविभागीय अधिकारी पदी बदली करण्यात आली होती तेव्हापासून बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी पद रिक्त होते व तात्पुरता प्रभार बल्लारपूर येथील तहसीलदार  मा.संजय आईचंवार यांच्याकडे होता मात्र आता बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी पदी दीप्ती सूर्यवंशी पाटील  यांच्या नियुक्तीमुळे बल्लारपूर येथील उपविभागीय कार्यालयातील कामाला गती प्राप्त होईल विशेष बाब म्हणजे बल्लारपूर शहर हे चंद्रपूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून ओळखले जाते.

        यासोबतच श्रीकांत राजगुरू यांची नागपूर येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, अर्जुनी मोरगाव येथील उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांची वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकारी पदी तर नागपूर येथील उपजिल्हाधिकारी(महसूल) सुजाता गंधे यांची उपजिल्हाधिकारी भूसंपादन गोसेखुर्द पदी नियुक्ती करण्यात आली आहे हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी असलेले चंद्रभान खंडाईत यांची उमरेड येथे उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.







Post a Comment

0 Comments