माजी खा. नरेशबाबू पुगलिया यांच्या शुभहस्ते इंदीरा गांधी किसान भवन येथे ध्वजारोहण संपन्न

 

माजी खा. नरेशबाबू पुगलिया यांच्या शुभहस्ते इंदीरा गांधी किसान भवन येथे ध्वजारोहण संपन्न

विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तर्फे प्रियदर्शनी इंदिराजी गांधी यांच्या पुतळा जवळ व गांधी चौक येथे भारतीय स्वतंत्र्यचे अमृत महोत्सव निमित्त मास्क व मिठाई वाटप

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : भारतीय स्वातंत्र्यचे ७५ व्या अमृत महोत्सव निमित्ताने विदर्भ किसान मजदूर काँग्रेस चंद्रपूर च्या वतीने चंद्रपूर शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. सर्वप्रथम इंदिरा गांधी काँग्रेस भवन येथे सकाळी ७.४५ वाजता माजी खासदार  नरेशबाबू पुगलिया यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी ८.३० ला प्रिदर्शनी इंदिराजी गांधी यांच्या पुतळ्याला  नरेशबाबू पुगलिया यांच्या हस्ते मालार्पण करण्यात आले. यानंतर नागरीकांना मास्क व मिठाई वाटप करण्यात आले.

 सकाळी ९.३० वाजता गांधी चौक चंद्रपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला काँग्रेसचे युवा नेते राहुलबाबू पुगलिया, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष  गजानन गावंडे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक  देवेंद्र बेले यानी मालार्पण केले. तसेच माजी खासदार  नरेशबाबू पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थित गांधी चौक येथे सर्व नागरिकांना मास्क व मिठाई वाटप करण्यात आले.

(विदर्भ किसान मजदूर काँग्रेस चंद्रपूर  तर्फे प्रियदर्शनी इंदिराजी गांधी यांच्या पुतळा परीसर मध्ये आकर्षक लायटिंग सजावट )

या सर्व कार्यक्रमात सर्वश्री काँग्रेसचे युवा नेते राहुल पुगलिया, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष गाजनन गावंडे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र बेले, जिल्हा महामंत्री अँड अविनाश ठावरी, नगरसेवक अशोक नागपुरे, चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष करन पुगलिया, इंटक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे,NSUI जिल्हाध्यक्ष स्वप्नील तिवारी, कामगार नेते वसंतराव मांढरे, रामदास वागदारकर, वीरेंद्र आर्या, अनिल तुंगीडवार, गजानन दिवसे, महेश वाटेकर, काँग्रेसचे अनंता हुड, अजय महाडोळे, सुधाकरसिह गौर, पृथ्वी जंगम, श्रीनिवास परणधी, दुर्गेश चौबे, शंकर महाकाली उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments