विदर्भ राज्य आंदोलन समिती उद्या बल्लारपूर बामनी टी पॉइंट येथे रास्ता रोको आंदोलन

 

विदर्भ राज्य आंदोलन समिती उद्या बल्लारपूर  बामनी टी पॉइंट येथे रास्ता रोको आंदोलन  

🔹स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माती सह विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन  

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : उद्या दि.  26/8/2021 गुरुवार   रोजी सकाळी 11:30  विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप, मुख्य संयोजक राम नेवले, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रंजना मामर्डे यांनी यांच्या मार्गदर्शनात 120 तालुके आणि 11 जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण केले. विदर्भातील लोकांना 200 युनिट पर्यंत वीज बनवण्याची आणि मोफत करण्याची मागणी, 200 युनिट पर्यंत विजेचे दर कमी करणे, विजेवरील लोडशेडिंग थांबवणे, कृषी पंपांचे लोडशेडिंग थांबवणे, विदर्भातील कृषी पंपांचे वीज बिल माफ करणे, पेट्रोल- डिझेलचे दर कमी करण्याच्या मागण्यांबाबत विदर्भ राज्य आंदोलन समिती रास्ता रोको आंदोलन करणार आहे.

 विराआंस युवा आघाडी बल्लारशाहच्या वतीने बामनी टी पॉइंट येथे रास्ता रोको आंदोलन होणार आहे.  स्वतंत्र विदर्भ राज्याचे युद्ध हे कुनाला आमदार,खासदार,मंत्री बनवीन्यासाठी नाही तर हे  एक सर्वसामान्यांचा त्यांच्या हक्कांसाठीचा लढा आहे. तर शेतकरी, बेरोजगार, व्यापारी, सामान्य जनता,तरुणांच्या हक्कांसाठी स्वातंत्र्याचे युद्ध आहे. 

या स्वातंत्र्य युद्धात आता युवकांशी  पुढे येने गरजेचे आहे असे मत तालुका अध्यक्ष‌ पराग गुंडेवार यांनी व्यक्त केले, उद्या होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने युवक, बेरोजगार, शेतकरी, व्यापारी, सामान्य नागरिकांनी  स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी अधिक बळकट करण्यासाठी आंदोलनात सामील होण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार,तालुका उपाध्यक्ष संजय घुगलोत,तालुका सचिव गौतम कांबळे, शहराध्यक्ष रोहित लोनारे, शहर सचिव संदीप केशकर यांनी केले आहे.







Post a Comment

0 Comments