राज्यभरातील शिक्षकांच्या शिष्टमंडळाची चंद्रपूर मनपाच्या शाळांना भेट
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : राज्यभरातील नगरपालिका आणि महापालिका शाळांतील शिक्षकांच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या विविध शाळांना भेटी दिल्या. सध्या कोरोनामुळे शाळा बंद होत्या. अशावेळी ऑनलाईन शिक्षणाची सोय चंद्रपूर महापालिकेने सुरु केली. ज्या विद्यार्थाकडे ऑनलाईन सुविधा नाही, अशासाठी त्यांच्या घरी जाऊन ऑफलाईन शिक्षण देण्यात आले. ज्यांना कॉन्व्हेंटचं शिक्षण परवडत नाही, अशा पालकांसाठी ही शाळा मोठी संधी निर्माण करून देणारी ठरलीय. हा उपक्रमशील प्रयोग बघण्यासाठी शिष्टमंडळ चंद्रपूर शहरात आले होते.
महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ, शाखा महानगरपालिका चंद्रपूरच्या वतीने शैक्षणिक कार्यशाळा घेण्यात आली. यानिमित्ताने राज्यभरातून आलेल्या नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकानी चंद्रपूर मनपाच्या शाळांना भेटी दिल्या. यात सावित्रीबाई फुले शाळा, शहिद भगतसिंग शाळा, महात्मा फुले शाळा यांचा समावेश होता. शिष्टमंडळात प्रयोगशील मुख्याध्यापक अर्जुन कोळी (नगर परिषद कराड शाळा जि. सातारा), अरूण पवार (अहमदनगर महानगरपालिका), सुनील खेलूरकर (नाशिक महानगरपालिका), सुभाष कोल्हे (बुलढाणा), साधनाताई साळूंखे (नगरपरिषद खापोली), मायाताई कांबळे (लातूर महानगरपालिका), प्रिया सिंग (औरंगाबाद महानगरपालिका), नंदा तादंळे (नगरपरिषद लोणावळा), सविता बोरसे (नाशिक महानगरपालिका), बाबासाहेब कडकल (नाशिक महानगरपालिका), संग्राम गाढवे (नगरपरिषद कराड) सहभागी झाले होते. चंद्रपूर मनपाचे शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नीत यांनी शिष्टमंडळाला सविस्तर माहिती दिली.
0 Comments