नगर परिषद बल्लारपूर मधील सर्व संवर्ग अधिकारी व नगर परिषद कर्मचारी यांच्या वतीने झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तवर हल्ल्याचा तीव्र निषेध

 




नगर परिषद बल्लारपूर मधील सर्व संवर्ग अधिकारी व नगर परिषद कर्मचारी यांच्या वतीने झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तवर  हल्ल्याचा तीव्र निषेध 

◾अधिकाऱ्याचे सांकेतिक आंदोलन  गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी

 ◾ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तवर हल्ला प्रकरणी

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : काल दिनांक 30 ऑगस्ट 2021 ला ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त श्रीमती. कल्पिता पिंपळे या अतिक्रमण विरोधी पथक घेऊन आपले कर्तव्य बजावण्यासाठी  गेले असता तिथे असलेले गुन्हेगारी प्रवृत्तीचे हातगाडी फेरीवाले श्री. अमरदीप यादव यांनी आपली हातगाडी सदर पथक जप्त करेल या हेतूने महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त श्रीमती. कल्पिता पिंपळे यांच्यावर व त्यांचे अंगरक्षक श्री. सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले विशेष बाब म्हणजे आपले कर्तव्य बजावीत असतांना एखाद्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही निषेधार्ह व चिंताजनक बाब आहे त्यामुळं नगर परिषद बल्लारपूर मधील सर्व संवर्ग अधिकारी व नगर परिषद कर्मचारी यांच्या वतीने झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करून या प्रकरणातील दोषींवर शीघ्रअतिशीघ्र कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या संबंधाने आज  दिनांक 31 ऑगस्ट 2021 ला प्रतिकात्मक स्तरावर कामबंद आंदोलन करण्यात आले या अनुषणगाने 

             मा.मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावत असणाऱ्या अधिकाऱ्यावर असे हल्ले करतात तेव्हा हल्ल्याने केवळ अधिकाऱ्याचेच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्चीकरण होते त्यामुळं अशा प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणे व हल्लेखोरावर कठोरात कठोर कारवाई करण्या बाबत चे निवेदन मा. दीप्ती सुर्यवंशी/पाटील उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांना दिले व 1 दिवस काम बंद ठेवून झालेल्या हल्ल्याचा/कृत्याचा जाहीर निषेध केला.









Post a Comment

0 Comments