बल्लारपूर-सास्ती मार्गावर हत्या करून मृतदेह टाकण्यात आला होता

 

बल्लारपूर-सास्ती मार्गावर हत्या करून मृतदेह टाकण्यात आला होता

◾त्या हत्या प्रकरणातील आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर येथील कन्नमवार वॉर्ड निवासी असलेले मारोती शंकर काकडे वय-34 हे वेकोली कामगार असून त्यांची 29 जुलै ला सायंकाळी 6:00 वाजताच्या दरम्यान बल्लारपूर-सास्ती मार्गावर हत्या करून मृतदेह टाकण्यात आला होता या संदर्भात बल्लारपूर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या प्रकरणात मृतकाची पत्नी प्राजक्ता मारोती काकडे, मृतकाची सासू कांता देवानंद भसाखेत्रे, संजय मारोती टिकले, विकास भास्कर नगराळे अशा चार आरोपींना अटक करण्यात आली असून या सर्व आरोपींना बल्लारपूर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सर्व आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास उमेश पाटील, पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड, शैलेंद्र ठाकरे करीत आहे.






Post a Comment

0 Comments