चंद्रपूर बाबुपेठ येथील क्रीडा संकुल बनतोय ड्रग्स / गांजा चा अड्डा

 

  चंद्रपूर बाबुपेठ येथील क्रीडा संकुल बनतोय ड्रग्स / गांजा चा अड्डा

चंद्रपूर मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासन करतेय दुर्लक्ष  आयुक्त पोलीस अधिक्षक यानी तात्काळ दखल घ्यावी  - आप चे राजु शंकरराव कुडे यांची मागणी

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष सुनिल देवरावजी मुसळे यांचे कडे बाबुपेठ वार्डातील जनतेची तक्रार आली तक्रारीची तात्काळ दखल घेऊन आपचे बाबुपेठ पदाधिकारी तथा शहर सचिव  
 श्री. राजु कुडे यानी चौकशी  केली असता बाबुपेठ येथील अंदाजे २ हेक्टर जागेमध्ये  प्रशासनाने करोडो रुपये खर्च करून देखणे व सुंदर सुशोभित असे क्रीडा संकुल उभारले .परंतु आता हे क्रीडा संकुल ला काही समाज कंटक लोक डाग लावण्याचा प्रयत्न करत आहे. 
या मैदानात सकाळ ला आणि सायंकाळच्या सुमारास वरिष्ठ नागरिक, युवा, महिला आणि येथील तरुणी मोठ्या प्रमाणात व्यायाम करायला/ फिरायला येत असतात.
अश्यात काही बाहेर चे टवाळखोर तरुण ३०-४० च्या संख्येत येतात खुले आम गांजा ओढतात .आणि आपसात मारहाण करून पळ काढतात .तसेच मागील काही दिवसा अगोदर एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह फासी लागलेल्या अवस्थेत आढळला होता. यामुळे येथे येणाऱ्या आम जनतेच्या मनात भीतीचे वातावरण असून  करोडो रूपये  खर्च करून ऊभारलेल्या संकुलाकडे जनतेनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे  समाज कंटकावर तात्काळ आवर घालावा नाहीतर  खूप मोठी घातपात होण्याची शक्यता आहे..
 त्याकरिता येथे महानगर पालिके तर्फे कायमस्वरूपी एक चौकीदार तर पोलीस प्रशासन कडून पेट्रोलिंग ची टीम प्रत्येक तीन तासाने भेट देणे आवश्यक आहे.

हे सर्व प्रकरण लवकरात लवकर थांबवले गेले पाहिजे  अन्यथा आम आदमी पार्टी बाबुपेठ, बाबुपेठ प्रभागातील जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि यास पूर्णतः पोलीस आणि मनपा प्रशासन जबाबदार राहतील. असे निवेदन मनपा आयुक्त आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. यावेळेस जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ मुसळे, शहर सचिव राजु शंकरराव कुडे ,युवा जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार, बाबुपेठ प्रभाग संघटन मंत्री अश्रफ भाई सय्यद, प्रभाग कार्याध्यक्ष  चंदू भाऊ माडुरवार ,बाला खैरे, निखिल बारसागडे, जयंत थूल, सुखदेव दारूंडे तसेच ईतर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. 





Post a Comment

0 Comments