आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घुग्घूस येथील राजीव रतन रुग्णालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घुग्घूस येथील राजीव रतन रुग्णालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

  चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घुग्घूस  येथील वेकोलीच्या राजीव रतन रुग्णालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी घुग्घूस  एरियाचे उपक्षेत्रीय प्रबंधक फुलारे, वणी क्षेत्राचे वरीय प्रबंधक पीसा रेड्डी, क्षेत्रीय चिकित्सा अधिकारी डॉ. डी. सी आनंद, चकित्सा अधीक्षक डॉ. डी. एम शंभरकर, घुग्घूस  उपक्षेत्राचे वरीय प्रबंधक दिलीप कुमार, उप प्रबंधक पी.व्ही बाराहाते, कार्यालय अधीक्षक आर.आर बांबोर्डे, डब्लू. यु पाझारे आदींची उपस्थिती होती.
      कोयला मंत्रालय यांच्या निर्देशानुसार आज गुरुवारी वेकोलीच्या सर्व एरियामध्ये वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिग च्या माध्यमातून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याच अंतर्गत  घुग्घूस  येथील वेकोलीच्या राजीव रतन रुग्णालयातही सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम उपस्थित वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन आ. जोरगेवार यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्य वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी आ. जोरगेवार यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करत वृक्ष वाटप करण्यात आले. आजच्या कार्यक्रमात लावण्यात आलेल्या वृक्षांचे योग्यरित्या संगोपन केल्या जाईल अशी अपेक्षा यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. तसेच वेकोलीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेड चे नेते इमरान खान, प्रेम गंगाधरे, स्वप्नील वाढई, प्रितम भोंगळे, आकाश चिलका, रफिक शेख, राजू नातर आदींची उपस्थिती होती. 








Post a Comment

0 Comments