चंद्रपूर महानगर पालिका हद्दीत मागील वर्षभरात दोन लाख ५८ हजार २४९ जणांनी कोव्हीड चाचणी केली

 

चंद्रपूर  महानगर पालिका हद्दीत मागील वर्षभरात दोन लाख ५८ हजार २४९ जणांनी कोव्हीड चाचणी केली

✳️चंद्रपूर शहरात केवळ ८ रुग्णसंख्या

✳️२५ हजार १४४ रुग्णांनी केली कोरोनावर मात

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : महानगर पालिका हद्दीत मागील वर्षभरात दोन लाख ५८ हजार २४९ जणांनी कोव्हीड चाचणी केली. यातील २ लाख ३२ हजार ६६२ जण निगेटिव्ह निघालेत. उर्वरित २५ हजार ५८७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आले. आतापर्यंत २५ हजार १४४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. सध्या केवळ ८ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ५ रुग्ण गृहविलीगीकरणात, १ रुग्ण खासगी रुग्णालयात तर मनपाच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण २ रुग्ण उपचार घेत आहेत.
मागील वर्षी कोव्हिडचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच महानगरपालिकेने व्यापक उपाययोजना केल्या. शहरात सात कोव्हिड चाचणी केंद्र सुरू केले. उपचारासाठी वन अकादमी व सैनिकी शाळा येथे व्यवस्था करण्यात आली. राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका अंमलबजावणी करीत आहे. शहरात जून ते ऑगस्टदरम्यान रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत मोठी घट झाली. दरम्यान, गत वर्षभरात कोव्हीडमुळे ४३५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील १५ दिवसापासून मृत्यूचा आकडा शून्य आहे. चंद्रपूर शहरात व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. १ लाखावर नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. यामुळे कोरोनाला हद्दपार करण्यात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. एप्रिलअखेर एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ४४६८ इतकी होती. मात्र, व्यापक उपाययोजनांमुळे शहरातील एकूण एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्यादेखील केवळ ८ वर पोहोचली आहे.

सध्या कोरोनाचे निर्बंध कमी करण्यात आले आहेत. मात्र, नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला असा समज करून घेऊ नये, मास्कचा नियमित वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे याचे पालन करावे, स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार व मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.

◾गृह विलगीकरण : ५
◾खासगी  रुग्णालय : १
◾कोव्हीड केअर सेंटर रुग्ण : २
◾एकूण एक्टिव पॉझिटिव्ह : ८









Post a Comment

0 Comments