सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला दहा प्रमुख पक्षांना दंड

 

सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला दहा प्रमुख पक्षांना दंड

भाजप, काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बसप, संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, आरएसएलपी, लोक जनशक्ती, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना दंड ठोठावला. 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने भाजप, काँग्रेस यांच्यासह दहा पक्षांना दंड ठोठावला. 

कोणाला किती दंड ?

भाजप, काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बसप, संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, आरएसएलपी, लोक जनशक्ती पक्ष यांना प्रत्येकी एक लाख रुपये दंड, तर सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी पाच लाख रुपये दंड ठोठावला आहे. 

सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले ?

कायदे करणाऱ्यांनी झोपेतून जागे व्हावे आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण होण्यापासून थांबविण्यासाठी पावले उचलावीत. परंतु, हे पक्ष गाढ निद्रेत आहेत.

राजकीय पक्ष झोपेतून जागे होण्यास तयार नाहीत. न्यायालयाचे हात कायद्याने बांधलेले आहेत. 

कायदे करण्याचे काम कायदेमंडळाचे आहे. आम्ही फक्त आवाहन करू शकतो. 

राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी मोठ्या शस्त्रक्रियेची गरज आहे. अशी शस्त्रक्रिया ते करतील अशी आशा आहे, असे न्यायालयाने यावेळी म्हटले आहे.

दरम्यान, बिहार निवडणुकीबाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. या निवडणुकीतील उमेदवारांविरुद्धचे गुन्हे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या आदेशांची अंमलबजावणी न केल्याबद्दल न्यायालयाने दहा प्रमुख पक्षांना दंड ठोठावला.






Post a Comment

0 Comments