उघडेल का नशिब माझ ?

 

उघडेल का नशिब माझ ? 

चोपडा-धनवाडी रस्त्याची दुरवस्था; खड्डे चुकवताना प्रवाशांची दमछाक

जळगाव /चोपडा ( राज्य रिपोर्टर ) : तालुक्यातील चोपड़ा धनवाडी रस्ता शेवटची घटका मोजत असून,या रस्त्याने ये - जा करणाऱ्या प्रवाशांना दुभंगलेला रस्ता व पडलेल्या खडड्यातून मार्ग काढताना दमछाक होत आहे.रस्त्यामुळे पाठीचा मणका व मानेचे विकार होण्याचा मोठा धोका उद्भवलेला असून सदर रस्ता खड्डेमय बनला आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये करण्यात आलेल्या हा रस्ता असून या रस्त्याचा प्रत्यक्ष वापर मात्र बारा महिने देखील नागरिकांना नीट वापर करता आला नाही. 

 काम सरू करणे व तो पर्ण करणे याच कालावधीत बराच काळ गेला. मुदत संपते तोच हा रस्ता पुर्णपणे उखडला असुन या रस्त्याने प्रवास करणाऱ्या धनवाडी,कोळंबा, कठोरा, सनपुले, या गावातील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. खड्डा चुकवतांना अपघाताचे प्रमाण वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर रस्त्याचे काम केले पाहिजे अशी मागणी प्रवास करणारे नागरिक करित आहे.







Post a Comment

0 Comments