बल्लारपूर वर्धा नदीत एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळले

 

बल्लारपूर  वर्धा नदीत एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळले

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील वर्धा नदीच्या संपेवेल, गणपती विसर्जन घाट ( संपवेल पंप ) येथे एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळून आले आहे सूत्राच्या माहिती नुसार आज दुपारी 12:00 च्या दरम्यान वर्धा नदीत प्रेत तरंगत असल्याची सूचना बल्लारपूर पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले व तपास सुरू केला सदर व्यक्तीचे प्रेत अंदाजे 2 ते 3 दिवसानंतर आढळून आल्याची चर्चा सदर परिसरात होती मात्र त्याव्यक्तीची ओळख पटविणे अवघड झाले आहे सदर व्यक्तीला कुणी ओळखत असल्यास बल्लारपूर पोलीस स्थानकात संपर्क साधण्याचे आव्हान बल्लारपूर पोलिसांनी केले आहे व यासंबंधीचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.






Post a Comment

0 Comments