राखीचा धागा हा शील, स्नेह आणि पवित्रतेचे रक्षण करणारे बंधन - आ. किशोर जोरगेवार

 

राखीचा धागा हा शीलस्नेह आणि पवित्रतेचे रक्षण करणारे बंधन - आ. किशोर जोरगेवार  

🔹यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रक्षाबंधन व स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन

 चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर )रक्षाबंधन या नावातच रक्षा शब्द आहे. त्यामूळे प्रत्येक परिस्थितीत बहिनीची रक्षा करण्याचे हे बंधन असून राखीचा धागा हा केवळ दोरा नसून हे शीलस्नेह आणि पवित्रतेचे रक्षण करणारे बंधन असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यंग चांदा ब्रिगेेडच्या महिला आघाडीच्या वतीने आज मंगळवारी रक्षाबंधन व स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.


    यावेळी यंग चांदा ब्रिगेेडच्या महिला आघाडीच्या शहर संघटिका वंदना हातगावकरग्रामिण विभागाच्या महिला अध्यक्षा सायली येरणेयुवती प्रमूख भाग्यश्री हांडेबहूजन आघाडीच्या महिला प्रमूख विमल कातकारआदिवासी महिला आघाडीच्या वैशाली मेश्रामबंगाली समाज आघाडीच्या सविता दंडारेआशा देशमूखनंदा पंधरेशांता धांडेवैशाली मद्दीवारशाईन शेखअनिता झाडेअस्मिता डोनारकरस्मिता वैद्यहजारेप्रेमीला बावणेमाधुरी निवलकरकल्पना शिंदेसिमा विलायतकर आदिंची उपस्थिती होती. 


यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कियंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संघटनेत सक्रिय महिला सदस्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामूळे महिलांच्या समस्या सोडविण्याची मोठी जबाबदारीही या संघटनेवर आहे. या संघटनेची महिला आघाडी उत्तमरित्या काम करत असून या संघटनेचा अध्यक्ष तथा येथील महिलांचा भाऊ म्हणून मी नेहमी त्यांच्या पाठीशी आहे. ही एक संघटना नसुन परिवार आहे. या परिवारातील प्रत्येक महिला ही आंनदी आणि निरोगी असली पाहिजे या दिशेने संघटना काम करत आहे. आजवर संघटनेच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक आरोग्य शिबीरे घेण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात  महिलांसाठी स्वंतत्र व्यायमशाळा असावी या दिशेनेही माझे प्रयत्न सुरु आहे.

    राखी चा दोरा हा नुसता दोराच नसून तो बहिण- भावाच्या नात्याचे प्रतिक आहे. ते एक शीलप्रेमळमायाच्या पवित्र्याचे रक्षण करणारे बंधन आहे. दिसायला छोटासा दिसणाऱ्या धाग्या सोबत अनेक जणांची पवित्र मने जुळलेली असतात. त्यांच्या भावनांचा आदर करणारा व पिढ्या न पिढ्या बहिण- भावाचे नाते टिकवून ठेवणारा हा सण आहे. बहिण- भावाचे हे प्रेमळ नाते भविष्या मधील पिढ्यां मध्ये असेच टिकून राहण्यासाठी प्रत्येकाने दर वर्षी येणारा हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला पाहिजे. असे आवाहणही यावेळी बोलतांना त्यांनी केले.

    यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या भगीनींनी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मनगटाला राखी चे पवित्र बंधन बांधून बहिनींचे रक्षण करण्याची ओवाळणी  स्वरुप मागणी केली.







Post a Comment

0 Comments