देशी बनावटीचे पिस्टल ( मौऊझर ) व चार जिवंत काडतुसासह युवकाला पोलिसांनी केली अटक




देशी बनावटीचे पिस्टल ( मौऊझर ) व चार जिवंत काडतुसासह युवकाला पोलिसांनी केली अटक

🔹स्थानिक गुन्हे शाखा ने शितप ने केले जेरबंद

चंद्रपूर (राज्य रिपोर्टर ) : जुलै महिन्यात चंद्रपुरात दिवसा गोळीबाराची घटना झाल्याने चंद्रपूर शहरातील लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक श्री. अरविंद साळवे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी चंद्रपूर शहरातील देशी-विदेशी खट्टे बाळगणार्यांची गोपनीय माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना कारवाई करण्यात  आदेशित केले होते.

दिनांक 29/ 8/ 2021 चे रात्री दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे गस्तवरील पथकास गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की, सागर एल पवार रा.येलपावार रा. भिवापूर वार्डा, चंद्रपूर हा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर चे मागील टावर टेकडी परिसरात देशी बनावटीची अग्निशस्त्र घेऊन फिरत आहे. अशी खबर मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे गस्तवरील पथक मिळलेल्या माहितीअनुसार सदर तात्काळ ठिकाणी रवाना झाले. सदर ठिकाणी पोहोचताच रात्रीचे 01:30  वाजेच्या सुमारास एक इसम टॉवर टेकडी कडून येणारे कच्च्या रोडने अंधारात एकटाच चालत येताना दिसला. त्याच्या संशय वाटल्याने त्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने त्याबाबत घेऊन विचारपूस केली करता  त्याने त्याचे नाव सागर संतोष येलपावार वय 31 वर्ष रा. महाविर नगर, भिवापूर वार्ड, चंद्रपूर, ता. जिल्हा चंद्रपूर असे सांगितले.

 त्यांचे अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल ( मौऊझर ) व चार जिवंत काडतुसे मिळून आली.

 त्याचे अंदाजित मूल्य 32,000/- ( बत्तीस हजार ) रुपये आहे. मिळालेली देशी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करून आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 855 /21 कलम 3,25  भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस स्टेशन रामनगर करीत आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अध्यक्ष श्री. अरविन्द साळवे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब खाडे, सहा पोलीस निरीक्षक बोबडे, पोलीस उप नि. सचिन गदादे, संदीप कापडे, पोलीस हवालदार नितीन साळवे, प्रकाश बल्की, सुभाष होळकर, मिलिंद, सतीश वाघमारे प्रमोद कोटनाके, संजय वडाई यांनी केली आहे.









Post a Comment

0 Comments