शुक्रवारी गडचिरोलीत युवासेना पदाधिकारी संवाद साधणार

 

शिवसेनेचा शिवसंपर्क अभियाना नंतर आता युवासेना संवाद!

🔸शुक्रवारी गडचिरोलीत युवासेना पदाधिकारी संवाद साधणार

🔸जिल्हा प्रमुख रियाज शेख यांची माहिती सामील होण्याचे आवाहन केले

गडचिरोली/अहेरी ( राज्य रिपोर्टर ) : शिवसेना पक्षाचे राज्यात शिवसंपर्क अभियाना नंतर आता युवासेना पदाधिकारी संवाद अभियान राबविण्यात येत असून युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यटनमंत्री ना.आदित्य ठाकरे यांचे मार्गदर्शन व सूचनेनुसार संवाद दौऱ्याच्या सहाव्या टप्प्यात पूर्व विदर्भात युवासेना पदाधिकारी संवाद दौरा असून शुक्रवार 20 आगष्ट रोजी गडचिरोलीत युवा सेना पदाधिकारी संवाद होणार असल्याची  माहिती शिवसेनेचे अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे.

      जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात, युवा सेना पदाधिकारी संवाद दौऱ्याच्या सहाव्या टप्प्यात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या पूर्व विदर्भातील जिल्ह्याचा समावेश असून  युवासेनेचे सचिव वरून सरदेसाई युथ सोबत थेट संवाद साधणार आहेत.  गडचिरोलीतील आरमोरी रोडवरील सांस्कृतिक भवनात दुपारी ठीक 1:00 वाजता युवासेना पदाधिकारी संवाद सुरू होणार असून अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातुन युवा सेना व युथ अधिक संख्येने पदाधिकारी संवादमध्ये सामील होणार असल्याचीही माहिती नमूद केले आहे.

     पुढे त्यांनी, 'हीच ती वेळ, युवकांनी आदर्श घेण्याची व ना. आदित्य ठाकरे यांची कामगिरी व लोकप्रियता दिवसेंदिवस वाढविण्याची आणि युवा वर्गाला विधायक कार्यात आकर्षित करण्याचे म्हटले असून जिल्ह्यातील व प्रामुख्याने अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील युवक व युवा सेना पदाधिकारी संवाद दौऱ्यात सहभागी होण्याचे अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी आवाहन करून यातून युवकांचे उत्साह व जोश टिकून राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात आवर्जून उल्लेख केले आहे.








Post a Comment

0 Comments