आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शहरातील विविध विकासकामांचे भुमिपूजन

 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शहरातील विविध विकासकामांचे भुमिपूजन


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  इग्लाज भवाणी वार्ड, बाबूपेठ,   भिवापूर वार्डातील लालपेठ जुनी वस्ती,  आणि संजय नगर येथील चार विकास कामांचे आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी शहर संघटिका वंदना हातगावकर, ग्रामीण विभागाच्या महिला अध्यक्षा सायली येरणे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, विश्वजित शाहा, अमोल शेंडे, नंदा पंधरे, रिजवान शेख, तापोष डे, कवडूजी गेडाम, आनंद रणशूर, चंद्रशेखर देशमूख, दत्तू गवळे, वैशाली मेश्राम,  आशा देशमूख, गौरव जोरगेवार आदिंची उपस्थिती होती.

  चंद्रपूर शहराच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु असुन शासनाचा निधी विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी उपलब्ध व्हावा याकरिता त्यांचा सातत्याने पाठपूरावा सूरु आहे. यात त्यांना यश प्राप्त होत असून विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. यातून ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक विकासकामे केल्या जात आहे. दरम्यान संजय नगर व बाबुपेठ येथील ओपन ग्रीन जिमसाठी जिल्हा वार्षीक योजने अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे. तर भिवापूर येथील सिमेंट काँक्रीट  रोड व सार्वजनिक शौचालयासाठी खनिज विकास निधी अंतर्गत निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या सर्व कामांचे आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, या भागाच्या विकासासाठी मि कटिबध्द आहे. येथील प्रलंबीत कामे जलदगतीने पूर्ण झाले पाहिजे हा आपला मानस असून त्या दिशेने माझे प्रयत्न सुरु आहे. येत्या काळात या भागातील आणखी काही कामे करायची आहे. हे सर्व प्रभाग आजवर दूर्लक्षीत राहिले असल्याने या भागांच्या विकासाला मि प्राधान्य देत असल्याचे ते यावेळी म्हणाले या भुमिपूजन कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 








Post a Comment

0 Comments