डेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा - आ. किशोर जोरगेवार

 

डेंगुच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष तयार करा - आ. किशोर जोरगेवार

🔹शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर) : जिल्ह्यात डेंगुच्या आजाराचे वाढते रुग्ण पाहता त्यांना योग्य उपचार मिळण्याकरीता सदर आजाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात यावे अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. अविनाश टेकाडे यांना केल्या आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या शिष्टमंडळाने आज सोमवारी अधिष्ठाता डाॅ. टेकाडे यांची भेट घेत चर्चा करत त्यांना सदर विषयाबाबतचे पत्रही दिले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक राशिद हुसेन,  यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, विलास वनकर, आनंद रणशूर, गौरव जोरगेवार आदिंची उपस्थिती होती.

  पावसाळ्यातील साचलेल्या पाण्यामूळे सध्या चंद्रपूरात जलजन्य आजार फोफावत आहे. शहरातील विविध भागात खोल खड्डे व खूली गटारे असल्यामूळे साचलेल्या पाण्यात डासांची पैदास वाढली आहें. यात गांभिर्याची बाब म्हणजे याच पाण्यात डेंगुच्या डासांचीही पैदास होत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात डेंगूच्या आजाराच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या आजारावरील उपचाराचा खर्च महागडा असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामूळे सदर आजारांचे रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होत आहे. याचा परिणाम येथील आरोग्य सेवेवर पडत आहे. त्यामूळे सदर रुग्णांना उत्तम उपचार मिळावा या करीता डेंगु आजाराच्या उपचारासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात यावा अशी सुचना सदर पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.






Post a Comment

0 Comments