बल्लारपूर शहरात आज आम आदमी पार्टीच्या वतीने जनआक्रोश आंदोलन

बल्लारपूर शहरात आज आम आदमी पार्टीच्या वतीने जनआक्रोश आंदोलन 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरात आज आम आदमी पार्टीच्या वतीने नगरपरिषद चौक येथे दुपारी 12:00 वाजताच्या दरम्यान जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे शहराच्या विविध भागातून आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते व बल्लारपूर कर समूहाच्या स्वरूपात एकत्र येऊन स्थानिक प्रशासनाविरोधात एल्गार पुकारणार आहे तसेच जनतेच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्याची मागणी करणार आहेत.

नवीन बस स्थानक, जनता शाळा, बस्ती पाई पदयात्रा, नगर परिषद चौक येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या जनआंदोलनाच्या माध्यमातून स्ट्रीट लाईटची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, शहराच्या सुरक्षा साठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, बल्लारपूर शहरात कोट्यावधी खर्च करून बांधलेल्या नवीन रस्ते उघडले असून ते दुरुस्त करण्यात यावी अशी विविध विषयांची कडे शासन व प्रशासन चे लक्ष हे ज्ञात येत आहे या आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 पक्षांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार मार्च 2019 पासून देशभरात लॉकडाउन सुरू होते तरी विजेचे बिल अव्वाच्या सव्वा स्वरूपात आले आहे. शासनाची वीज बिल माफीच्या संदर्भात भूमिका स्पष्ट नाही. असा प्रश्नही सामान्य जनता करीत आहे या सर्व विविध मागण्यांच्या अनुषणगाने बल्लारपूर शहरात जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे व यात मोठ्या स्वरूपात सहभागी होण्याचे आवाहन आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.







Post a Comment

0 Comments