जिल्हा सामान्य रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यु

  

जिल्हा सामान्य रुग्णालयात  वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यु 

 ◾दोषींवर कारवाई करण्याची मागणी

 ◾तासभराचा कालावधी लोटूनही डॉक्टर तेथे आले नाही

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : रुग्णालय व वैद्यकीय अधिकारी हे कोरोना काळात देवदूत बनून सामान्य रुग्णाची सेवा करतांना दिसून येत होते मात्र कोरोना नियंत्रणात येत असतांना इतरही रुग्णाकडे लक्ष देणे गरजेचे असताना मात्र उपचाराअभावी एखाद्या चा जीव जाने ही दुर्दैवी बाब आहे मात्र अशाच प्रकारची एक घटना जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली आहे.   

         रक्ताची कमतरता असल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या एका १७ वर्षीय युवतीचा उपचाराअभावी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी ( ता. २१ )  दुपारच्या सुमारास येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. सानिका कोंडुजी अनमुलवार असे मृत मुलीचे नाव आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील कोंडुजी अनमुलवार यांच्या सानिका या मुलीची प्रकृती बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथील कर्मचाऱ्यांनी तिला दाखल करून घेतले. वार्डात बेडसुद्धा देण्यात आला. मात्र, तासभराचा कालावधी लोटूनही डॉक्टर तेथे आले नाही. यात उपचाराअभावी तिचा मृत्यू झाला. या प्रकाराने कुटुंबीयांनी रुग्णालयातील सुविधेविरोधात संताप व्यक्त करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.








Post a Comment

0 Comments