बल्लारपूर पेपर उद्योगातील एका कामगारांवर बिबट्याने हल्ला

बल्लारपूर पेपर उद्योगातील एका कामगारांवर बिबट्याने हल्ला

 🔸बिबट्याच्या हल्ल्यात पेपरमिल कामगार गंभीर जखमी

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर पेपर उद्योगातील एका कामगारांवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवार रात्री १० ते १०:३० वाजताच्या दरम्यान घडली आहे विश्वास उध्दव गिरसावळे वय-३६ रा.विसापूर असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे विश्वास हा बल्लारपूर पेपरमिल मध्ये आपली २ ते १० ड्युटी आटोपून आपल्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाला असता पेपरमिल वसाहत पार झाल्यावर झुडुपात दबा धरून असलेल्या बिबट्याने विश्वासाच्या दुचाकीवर झडप घेतली मात्र आरडाओरडा करून विश्वासने बिबट्याला हुसकावून लावले मात्र या हल्ल्यात विश्वासाच्या डाव्या खांद्यावर गंभीर जखमी झाली याच जखमी अवस्थेत विश्वासला विसापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले व प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले या घटनेची माहिती वनपरिक्षेत्रअधिकारी मा.संतोष थिपे यांना देण्यात आली असून वनरक्षक श्री टेकाम यांनी या हल्ल्यात जखमींची चौकशी केली आहे.

          विशेष बाब म्हणजे बल्लारपूर पेपरमिल वसाहतीला लागून असलेल्या जुन्या पॉवर हाऊस परिसरात मोठ्या प्रमाणावर झुडपी जंगल वाढले असून या बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या माहितीनुसार या परिसरात एक वाघ व एक बिबट्या सोबत त्यांच्या पिल्ल्याचे वास्तव्य आहे शिवाय अनेकदा कामगारांना या वन्य प्राण्यांचे दर्शन झाले आहे त्यामुळे पेपरमिल उद्योगातील कामगार रात्रपाळीत कामावर येण्यास घाबरतात त्यामुळे वनविभाग, पेपरमिल व्यवस्थापन व स्थानिक प्रशासनाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.






Post a Comment

1 Comments

  1. Mr Manohar dotpellyji.....aapki news me speling mistake kitana h pls dhyan dijiye .......

    ReplyDelete