महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर चंद्रपूर व कार्तिकश्री फाऊंडेशन तर्फे स्त्रियांचे आरोग्य तपासणी शिबिर व औषधी वाटप.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर चंद्रपूर व कार्तिकश्री फाऊंडेशन तर्फे स्त्रियांचे आरोग्य तपासणी शिबिर व औषधी वाटप.

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर चंद्रपूर व कार्तिकश्री फाऊंडेशनच्या संयुक्त वतीने मंगळवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी जयलहरी कान्वेंट संजय नगर येथे स्त्रियांचे आरोग्य तपासणी शिबिर औषधी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनदिप भाऊ रोडे ,  प्रमुख पाहुणे शहर अध्यक्ष मनसे चंद्रपूर, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. नगीना नायडू MBBS, DGO,प्रमुख पाहुणे  सुमित करपे शहर सचिव मनसे, डॉ. विरेंद्र कोल्हे  स्वाभी राऊत विभाग अध्यक्ष महिला सेना , संगीता धात्रक शाखा अध्यक्ष महिला सेना, मुख्याध्यापीका.चंदा जिवतोडे उपस्थित होते. शिबिरात डॉक्टर. नगीना नायडू यांच्या मार्गदर्शनात महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच महिलांना औषधीचे वाटप करण्यात आले यावेळी मनसे शहर अध्यक्ष मनदिप रोडे यांनी मनसे स्त्रियांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी जिल्ह्यात यापुढेही महिलांचे आरोग्य शिबीर राबविणार आहे. महिलांच्या आरोग्यासाठी मनसे पुढाकार घेणार आहे. असे मार्गदर्शन केले.शिबिरात मनसे पदाधिकारी परिसरातील महिला,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्या करिता  नितेश जांभुळकर प्रसिद्धी प्रमुख , राहुल मडावी व आदि मनसेंनिंक उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments