"दुचाकी वाहन चोरट्यांचा सुळसुळाट"

 

"दुचाकी वाहन चोरट्यांचा सुळसुळाट"   

🔸दुचाकी गाड्यांचे होत असलेली चोरी यामुळे सामान्य जनात भीतीचे वातावरण 

 🔸चंद्रपूर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये  तक्रार  नोंद 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : आज दिनांक 10 जुलै रोजी चंद्रपूर येथील उत्तम नगर बंगाली कॅम्प वॉर्डातून शुभम शेट्टी या व्यक्तीची हिरो  स्प्लेंडर प्लस MH 34 BQ 7771 ही गाडी चोरीला गेली आहे. रात्र दहापर्यंत गाडी घरीच उभी होती सकाळी उठल्यावर ते गाडी ठेवलेल्या ठिकाणी दिसून आली नाही आजूबाजूला शोध घेतला मिळून आली नाही. तसेच दोन दिवस आधी गजानन महाराज मंदिर जवळ सरकार नगर या वॉर्डातून सुद्धा स्प्लेंडर ही गाडी चोरीला गेली अशी तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद घेण्यात आली. अशा दुचाकी गाड्यांचे होत असलेली चोरी यामुळे सामान्य जनात भीतीचे वातावरण आहे, आणि ज्यांचे गाडी चोरीला गेलेली आहे ते व्यक्ती खूप नाराज आहे, लवकरात लवकर अशा दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक करावी अशी मागणी सामान्य जनता करत आहे.







Post a Comment

0 Comments