जगन्नाथ बाबा मठ म्हणजे सेवेची प्रेरणा देणारे केंद्र - आ. किशोर जोरगेवार

 

जगन्नाथ बाबा मठ म्हणजे सेवेची प्रेरणा देणारे केंद्र - आ. किशोर जोरगेवार

🔸भवणासाठी 45 लक्ष रुपये देणार, धोगरी काला कार्यक्रमाचे आयोजन
 
  चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : युग बदतल असले तरी जगनाथ बाबांवर प्रेम करणारा सेवाकरी वर्ग आजही सेवेचा वसा समोर नेत समाजाची सेवा करण्याचे काम करत आहे. अशा सेवेकरी समाजाची समाजानेही दखल घेतली आहे. या मठातून समाज प्रबोधनाचाच्या माध्यमाने सक्षमीकरणाचा, व्यसनमुक्तीचा, माणुसकीचा संदेश समाजात जात असून हे मठ म्हणजे सेवेची प्रेरणा देणारे केंद्र असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. तसेच येथील समाजभवणासाठी 45 लक्ष रुपये देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.  
  आज सोमवारी धानोरा येथील जगन्नाथ बाबा मठ येथे धोगरी काला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी धाणोरा संरपच छाया वासाडे,  पिपिरी सरंपच वैशाली मातणे, माजी  मारडा संरपच गणपत कुडे,बंडू चौधरी, प्रकाश येलबलवार, नामदेव बोबडे, नंदकिशोर वासाडे, चंद्रकांत खांडेकर, दशरथ बोडे, आनंदराव आस्वले, गणेश निखाडे, रविंद्र गोखरे, दिवाकर बोढे, रमेश ठावरी, नथ्थुजी बोंगाडे, सुरेश निखारे, गजानन बोढे, शंकर पोढे, गजानन मानूसमारे, राजू पिंपळशेंडे आदिंची उपस्थिती होती.
    यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, राजकारणात अथवा समाजकारणात काम करत असतांना सेवा हा प्रमुख उद्देश असला पाहिजे. सेवेचा मार्ग हा मनाला शांती आणि समाधान देणारा आहे. येथील जगन्नाथ बाबा मठ मागील अनेक वर्षापासून समाजाला सेवेची प्रेरणा देण्याचे कार्य करत आहे. त्यामूळे हे मठ पंचकोशीत सेवाकरींसाठी केंद्रस्थान आहे. आज इथे आल्यानंतर नवी उर्जा मिळाली आहे. थोर संतांनी त्याकाळी समाजाच्या उत्थानसाठी दिलेला संदेश आज घरोघरी पोहचविण्याचे काम या मठाच्या माध्यमातून केल्या जात आहे. त्यामूळे हे केंद्र सर्व सोयीसुविधायुक्त करण्याची गरज आहे. येथे एक चांगल्या भवणाची निर्मीती व्हावी अशी माझी जुनी ईच्छा होती. आता जगन्नाथ बाबांच्या आणि त्यांच्या भक्तांच्या आशीर्वादाने हे भवण निर्माण करण्याचा अधिकारही मला प्राप्त झाला असून येथील भवणासाठी मी 45 लक्ष रुपये देणार असल्याची घोषणा यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधिकारी आज मी माझ्या सोबत आणले असून अधिका-यांनी जागा ठरवून त्याला लागणा-या खर्चाचा आराखडा सादर करावा असेही ते यावेळी म्हणाले. पठाणपुरा गेट बाहेर आलेल्या गजानन बाबा मठच्या सैदर्यीकरणासाठी आपण तीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून येथे दर्जेदार काम केले जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.  या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची जगन्नाथ बांबाच्या भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.








Post a Comment

0 Comments