पत्रकारांना धमकी द्याल तर याद राखा - डी. टी. आंबेगावे

 

पत्रकारांना धमकी द्याल तर याद राखा - डी. टी. आंबेगावे

♦️प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे एसपीना निवेदन, आरोपीला बेड्या

यवतमाळ ( राज्य रिपोर्टर ) : यवतमाळ येथील रेशन माफीया शेख रहीम शेख करीम गरीबांच्या धान्याची बाजारात विक्री केल्या प्रकरणी तसेच लोकमतचे पत्रकार सुरेंद्र राऊत यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीवर  कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने पोलीस अधिक्षक यवताळ यांना निवेदनाव्दारे केली आहे. 

शेख रहीम शेख करीम रा. स्वस्तीकनगर वर्धा याला अटक करून सहायक पोलीस निरीक्षक रामकृष्ण भाकडे यांनी बुधवारी मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने शेख रहीम याची कारागृहात रवानगी केली आहे.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यम निष्पक्ष व निर्भीड भुमिका मांडतात. त्यांच्या निर्भीड कार्याने व कर्तव्याने समाजातील अवैध व्यवसायिक , गावगुंड चवताळुन उठताना दिसतात. यवतमाळ तालुक्यात, शहरात गरीबाचे राशन काळया बाजारात कशा प्रकारचे विकले जाते याचे सत्य वृत्त लोकमतचे पत्रकार सुरेंद्र राऊत यांनी प्रकाशित केले होते. वृत्तातील मजकुर व सत्य लिखानामुळे राशन माफियाचे पितळ उघडे पडले. त्यामुळे आरोपी शेख रहीम हा भडकला. एवढेच नव्हे तर त्याची मजल भ्रमणध्वनी वरून सुरेंद्र राऊत यांना जिवे मारण्याच्या धमकी पर्यंत पोहचली ही लोकशाहीच्या स्तंभाची मुस्कटदाबी असून पत्रकारांना कोणी जीवे मारण्याची धमकी देत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी दिला आहे. पत्रकार हा समाज परिवर्तनाचे महत्वाचे कार्य करीत असून, गोरगरिबांचा आवाज बुलंद करण्यासाठी सातत्याने धडपडत आहे अशा पत्रकारांना धमकी दिल्यास कदापिही खपवून घेणार नसल्याचे विदर्भ अध्यक्ष विजय बुंदेला यांनी सांगितले. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मस्तावलेल्या गावगुंडाना कायद्याच्या बेडया ठोकुन शेख रहीमवर आणखी कठोर  कारवाई करावी यासाठी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी जोर लावून धरला आहे. निवेदन देणेसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे विदर्भ अध्यक्ष विजय बुंदेला, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, उमरखेड तालुकाध्यक्ष मारोती गव्हाळे, संघाचे पदाधिकारी उदय पुंडे, मोहन कळमकर, विनोद गायकवाड, मैनोदीन सौदागर, गोपाळ गौरवाड, विकास चापके, वसंता नरवाडे, गजानन गंजेवाड, मनोज राहुलवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments