विविध ठिकाणी राष्ट्रध्वजाला सलामी, शासकीय निमशासकीय कार्यालयात पार पडला कार्यक्रम

 

विविध ठिकाणी राष्ट्रध्वजाला सलामी, शासकीय निमशासकीय कार्यालयात पार पडला कार्यक्रम

🔸बल्लारपूरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरात स्वातंत्र्याचा ७४ वर्ष पूर्ण होऊन अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे या निमित्ताने विविध ठिकाणी ध्वजारोहण पार पडले बल्लारपूर शहरातील मुख्य शासकीय कार्यक्रम उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला या ठिकाणी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण मा.दीप्ती धनंजय सूर्यवंशी पाटील, उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर यांच्या हस्ते सकाळी ९:०५ वाजता पार पडला यावेळी मुख्य अतिथी म्हणून नगराध्यक्ष हरीश शर्मा, विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी बल्लारपूर, संजय आईचंवार, तहसीलदार बल्लारपूर, उमेश पाटील, पोलीस निरीक्षक बल्लारपूर, रमेश कुळसंगे, सी.जी.तेलंग नायब तहसीलदार बल्लारपूर, चंदनसिह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ  महाराष्ट्र राज्य, घनश्याम मूलचंदानी माजी नगराध्यक्ष बल्लारपूर, राजू झोडे, संपत कोरडे, भास्कर माकोडे, एलल्या दासरफ, सिक्की यादव, काशी सिह, कमलेश शुक्ला यांच्यासह नगरसेवक, विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, शहरातील गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती या कार्यक्रमानंतर मान्यवर अतिथीच्या हस्ते मतदार कार्डचे वितरण करण्यात आले.


         या नंतर बल्लारपूर नगर परिषदेच्या प्रांगणात नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते सकाळी ९:३५ वाजता राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण पार पडले विशेष बाब म्हणजे बल्लारपूर शहराचे ऐतिहासिक वैभव असलेले गोंड राजे यांचे वंशज राजे केशवंशाह आत्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी नगर सेवक, विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, शिक्षक वर्ग, पत्रकार बांधव, आरोग्य विभागाचे अधिकारी, पोलीस  बांधव, नगर संरक्षण दल ई ची उपस्थिती होती.

         तदनंतर बल्लारपूर शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या किल्ल्यावर सकाळी १०:१५ वाजता बल्लारपूर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष सौ मीना चौधरी यांच्याहस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी केशवशहा आत्राम महाराज (गोंड राजाचे वंशज), चंदनसिह चंदेल, राजू झोडे, संपत कोरडे, लखनसिह चंदेल, कमलेश शुक्ला, सिक्की यादव, देवेंद्र आर्य, भास्कर माकोडे, पवन मेश्राम, येल्लया दासरफ, विकास दुपारे, आशिष देवतळे, काशीसिह, समीर केने, नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी, रोटरी क्लबचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी मंडळ, पत्रकार बंधू इ ची उपस्थिती होती.

            याशिवाय बल्लारपूर येथील अग्निशमन विभागाच्या कार्यालयात मा.विजयकुमार सरनाईक यांच्याहस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी अग्निशमन विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.जयभीम चौक परिसरात मा.उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्याहस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी संतोष बेताल, देविदास करमनकर व अनेक गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती. भारतीय जनता पक्ष कार्यालयात मा.चंदनसिह चंदेल यांच्याहस्ते ध्वजारोहण पार पडले याप्रसंगी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. बल्लारपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात प्राचार्य कल्याणी पटवर्धन मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती तर गुरुनानक विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य जी.एम.बहिरवार सर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यासोबतच बल्लारपूर शहरातील विविध शाळा-महाविद्यालय, व्यापारी मंडळ, विविध सामाजिक संघटना, शासकीय-निमशासकीय संस्थेत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ध्वजारोहण पार पडले.









Post a Comment

0 Comments