पडोलीच्या विकासासाठी कटीबध्द - आ. किशोर जोरगेवार

 




पडोलीच्या विकासासाठी कटीबध्द - आ. किशोर जोरगेवार

पडोली येथील शेकडो युवकांचा उपस्थितीत यंग चांदा ब्रिगेडच्या शाखेचे उद्घाटन

         चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  पडोली हे चंद्रपूरचे स्वागतद्वार आहे. चंद्रपूरात येणारा व्यक्ती हा पडोलीतून जातो त्यामूळे या भागाचा सर्वसमावेशक विकास झाला पाहिजे या दिशेने माझे पर्यत्न सुरु आहे. येथील विकासासाठी आपण ७६ लाखांचे कामे मंजूर केले असून येथील विकासासाठी मी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

   काल रविवारी पडोली येथील शेकडो युवकांच्या उपस्थितीत आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते यंग चांदा ब्रिगेडच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे नेते राकेश पिंपळकर, विक्की रेगन्टीवार, नकुल वासमवार यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेडमध्ये मोठ्या संख्येने युवक शामील होत आहे. सामाजिक क्षेत्रात संघटना उल्लेखनीय कार्य करत आहेच मात्र या सोबतच या संघटनेच्या माध्यमातून नागरिकांचे अधिकाधिक प्रश्न सोडविण्याचा आमचा मानस आहे. पडोली येथील यंग चांदा ब्रिगेडची शाखा सुरु होत आहे. या शाखेच्या माध्यमातून या भागातील नागरिकांच्या अडचणी माझ्या पर्यंत पोहचाव्यात असे आवाहण यावेळी त्यांनी केले.

 पडोलीचा विकास झाला पाहिजे यासाठी आपण मोठा निधी उपलब्ध करुन दिला या निधीतून येथील सिमेंट काँक्रिटचे मार्ग, स्मशानभूमी, यासह इतर विकासाचे कामे केल्या जाणार आहे. पूढे ही या भागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी माझे प्रयत्न असणार असल्याचे ते यावेळी बोलतांना म्हणाले. या भागात लाईट नसल्याने येथे हायमास्क असला पाहिजे अशी मागणी आली होती. ती पण आपण पुर्ण केली आहे. आज त्याचे लोकार्पणही संप्पन्न झाले. येथे स्वर्गरथची मागणी आली असून या स्वर्गरथसाठी मी १५ लक्ष रुपये देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तसेच या चौकाचे सौदर्यीकरण करणे व येथील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठीही येत्या काळात निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. 

यावेळी गणेश पाचभाई, राहूल सोनकुसरे, राजा शेख, अमोल आमटे, रुपेश गावतुरे, संजू गोलवंशी, राकेश केळकर, बाबा शेख, शेखर मेश्राम, रितेश केळकर, रितीक यादव, चंद्रकांत शेलोटे, निक्की यादव, अमिर शेख, बबलू काजी, सलीम काजी, भाग्यवान गनफुले, दिपक मिश्रा, शुभम ठेमस्कर, अयाम कच्ची, साहिल शेख, रजा शेख, सुरज साव, मुर्तजा शेख, शारुख शेख, अमोल चौधरी, गणेश देशमूख, मुकेश लाळसे, सोनू गुरुनुले, प्रमोद शेंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.









Post a Comment

0 Comments